S M L

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. गेले तीन आठवडे ते आजारी होते.

Sonali Deshpande | Updated On: Dec 4, 2017 06:30 PM IST

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन

04 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. गेले तीन आठवडे ते आजारी होते.

ते देखणे होते. कुठल्याही मुलीला भुरळ पाडणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व. शशी कपूर यांच्या रोमँटिक अभिनयानं अनेक सिनेमांवर त्यांची छाप पडलीहोती. कपूर भावांमधले सर्वात धाकटे. बालबिरराज नाव बदलून कायमचं नाव झालं शशी कपूर. शशी कपूर यांचा जन्म 1938चा. त्यांची पहिली भूमिका 12व्या वर्षी आवारा सिनेमातली. राज कपूरच्या धाकट्या भावाचं काम आवारामध्ये केलं होतं.

शशी कपूर यांचा पहिला हिट सिनेमा जब जब फूल खिले. 1965मध्ये बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक केला. शशी कपूर या लोभस व्यक्तिमत्त्वानं प्रेक्षकांच्या मनावर गारूडच केलं. वक्त, शर्मिली, चोर मचाये शोर, सिलसिला, नमकहलाल, त्रिशूल आणि कभी कभी....शशी कपूर यांचा फॅन क्लब वाढतच चालला होता. दिवार सिनेमानं त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं ॲवॉर्ड मिळवून दिलं.. त्यांचा दिवारमधला डायलॉग अजरामर झाला.जुलै 1958मध्ये जेनिफर या इंग्लिश अभिनेत्रीशी लग्न झालं. त्यानंतर शशी कपूरयांनी इंडो-इंग्लिश फिल्म्स बनवल्या . हाऊसहोल्डर, शेक्सपियरवाला अशा त्या फिल्म्स होत्या.

अभिनेता ते निर्माता असा त्यांचा प्रवास सुरू झाला ते श्याम बेनेगल यांच्या जुनूनपासून आणि नंतर कलयुग.  80च्या दशकात त्यांनी विजेताची निर्मिती केली. त्यात त्यांचा मुलगा कुणाल मुख्य भूमिकेत होता तर ते स्वत: वडिलांच्या भूमिकेत. 1991मध्ये त्यांनी अजूबाचं दिग्दर्शन केलं.

शशी कपूर यांचा शेवटचा सिनेमा कस्टडी. त्यात त्यांनी वयोवृद्ध आणि कंटाळलेल्या कवीची भूमिका साकारलेली. 2010मध्ये त्यांना फिल्म फेअरचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. तर 2011मध्ये पद्मभूषण आणि 2015मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आपल्या मर्जीनं आपलं आयुष्य समृद्धकेलेल्या या दिग्गजाला  New18lokmatचा सलाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 06:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close