मुंबई, 16 जानेवारी: राज कपूर, पृश्वीराज कपूर, ऋषी कपूर, शशी कपूर ते आता आलेल्या करिना करीश्मा रणबीर कपूरपर्यंत या कलाकारांनी कपूर घराण्याची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द पुढे सुरू ठेवली. कपूर घराण्यातील रणबीर कपूर हा सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. मात्र आता रणबीरला टक्कर देण्यासाठी कपूर घराण्यातील आणखी एक व्यक्ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. रणबीर कपूरचा चुलत भाऊ अर्थात अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हंसल मेहताच्या नव्या सिनेमात जहान प्रमुख भूमिका सकारणार आहे. 'फराझ' या सिनेमातून जहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. फराझ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
फराज सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यात जहान कपूरबरोबर अभिनेते परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावलही प्रमुख भूमिकेत आहे. 2016मध्ये ढाक्याच्या एका कॅफेमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यावर हा सिनेमा आधारीत आहे. आतंकवादी हल्ल्याची ती रात्र सिनेमा दाखवण्यात येणार आहे. आतंकवाद्यांनी अनेक निर्दोष लोकांना मारून टाकलं होतं. तेव्हा लोकांचा जीव वाचवण्यासाठी आतंकवाद्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एका तरूण, बेधडक फराज सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 3 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - 'विवाह' फेम पूनमची रिअल लाईफ Love Story आता येणार समोर; नवऱ्यासह केली मोठी घोषणा
जहान कपूर हा शशी कपूर याचा नातू म्हणजेच अभिनेते कुणाल कपूर यांचा मुलगा आहे. जहानला शायरा ही बहिण आहे. करीना आणि करिश्माबरोबर जहानचे चांगले संबंध आहेत. जहाननं सिनेमा साइन केला होता तेव्हा दोन्ही बहिणींनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. कपूर घराण्याच्या अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये जहानला स्पॉट करण्यात येतं.
जहान अनेक वर्ष थिएटरमध्ये काम करतोय. अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या 'पिताजी प्लीज' या नाटकातून त्यानं डेब्यू केला. पृश्वी थिएटरमध्ये जहाननं अनेक कार्यक्रम केलेत. जहान सोशल मीडियावरही सक्रिय असतो. जहानच्या व्हिडीओ आणि फोटोंना विशेष पसंती असते. कपूर घरातील इतर कलाकारांप्रमाणे जहानला देखील प्रेक्षक तितकंच प्रेम देतील अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News