'बंदुक्या'तल्या शशांक शेंडेंचा डोरल्या आगळा वेगळा

'बंदुक्या'तल्या शशांक शेंडेंचा डोरल्या आगळा वेगळा

हा डोरल्या आहे तरी कसा? बिनधास्त, तिखट, स्पष्टवक्ता. या सिनेमाची पार्श्वभूमी जुन्नर तालुक्यातली आहे.

  • Share this:

31 आॅगस्ट : 'बंदुक्या' सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. शशांक शेंडेंचा डोरल्या सगळ्यांना खुणावतोय. 'बंदुक्या'मध्ये शशांक शेंडे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

हा डोरल्या आहे तरी कसा? बिनधास्त, तिखट, स्पष्टवक्ता. या सिनेमाची पार्श्वभूमी जुन्नर तालुक्यातली आहे. तिथल्याच भाषेचा वापर मोठ्या खुमासदारपणे सिनेमात केलाय.  ही भाषा डोरल्याचं वैशिष्ट्य ठरलंय.

शशांक शेंडे यांनी मराठी,हिंदी  सिनेमात नेहमीच लक्षवेधी भूमिका केल्यात. त्यामुळे त्यांचा डोरल्या पाहायची उत्सुकता आहे.

सिनेमाची कथा एका विशिष्ट समाजातल्या ठराविक प्रथेवर आहे. 'बंदुक्या'मध्ये आतिशा नाईक, निलेश बोरसे, नामदेव मुरकुटे आणि विनायक साळवे यांच्या भूमिका आहेत. सिनेमा 1 सप्टेंबरला रिलीज होतोय.

५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'बंदुक्या' सिनेमाने ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण असे हे पुरस्कार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 06:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading