मृणाल दुसानिसचा कमबॅक, 'या' अभिनेत्याबरोबर जमली जोडी

'हे मन बावरे' मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरू होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2018 04:40 PM IST

मृणाल दुसानिसचा कमबॅक, 'या' अभिनेत्याबरोबर जमली जोडी

मुंबई, 12 सप्टेंबर : कलर्स मराठीवरील 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसानिसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिनं मालिका अर्धवट सोडली. मृणाल 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' आणि  'तू तिथे मी'मुळे घराघरात पोचलीय. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. कलर्स मराठीवरीलच 'हे मन बावरे' या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'हे मन बावरे' मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरू होत आहे. मालिकेमध्ये बिग बॉस मराठीमधील शर्मिष्ठा राऊत देखील असणार आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. या दोघांना पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

शशांक केतकरनं सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. तो लिहितो, 'जुने मित्र, नवी कथा. नमस्कार मंडळी, बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने नवी सुरूवात करतो आहे, मधुगंधा कुलकर्णी तुझ्या लेखणीतून आणि मंदार देवस्थळी तुझ्या दिग्दर्शनातून साकारलेलं पात्र पुन्हा एकदा करायला मिळणं, हे मी खरंच माझं भाग्य समजतो. मृणाल दुसानिस आणि शर्मिष्ठा राऊत यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्रींबरोबर काम करायला मिळणं ही आणखीन एक जमेची बाजू आहे. कलर्स मराठीने मला ही अप्रतिम संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. नवीन अपडेट देत राहीन. ९ ऑक्टोबरपासून हे मन बावरे बघायला विसरू नका. '

Loading...

 

View this post on Instagram

 

जुने मित्र, नवी कथा 😊 नमस्कार मंडळी, बाप्पाच्या आशिर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने नवी सुरुवात करतोय. @madhugandhakulkarni तुझ्या लेखणीतून आणि @mandarr_devsthali तुझ्या दिग्दर्शनातून साकारलेलं पात्र पुन्हा एकदा करायला मीळणं, हे मी खरच भाग्य समजतो माझं. @mrunaldusanis_official @sharmishtharaut सारख्या अनुभवी अभिनेत्रीं बरोबर काम करायला मिळणं ही आणखी एक जमेची बाजू. @colorsmarathiofficial thank you so much for this wonderful opportunity 😊🙏 नवीन updates देतच राहीन. तेव्हा बघायला विसरू नका, 9 ऑक्टोबर पासून 'हे मन बावरे ❤️'

A post shared by Shashank Shirish Ketkar (@shashankketkar) on

शशांक केतकर आणि मृणाल कुलकर्णी यांची जोडी पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

गणपती आणि माझी मैत्री आहे - हर्षदा खानविलकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2018 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...