माझ्यात श्री आणि सिद्धार्थ दोघंही आहेत - शशांक केतकर

हे मन बावरे मालिकेतला सिद्धार्थ माणसावर प्रेम करतो. व्यक्तीच्या निरागसतेवर जीव लावतो, शशांक केतकर सांगतो.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2018 02:29 PM IST

माझ्यात श्री आणि सिद्धार्थ दोघंही आहेत - शशांक केतकर

मुंबई, 10 आॅक्टोबर : काहीही हं श्री... हा डायलाॅग अजूनही अनेक घरात बोलला जातो. यातल्या श्रीची भूमिका करणारा शशांक केतकर आजही फॅन्समध्ये लोकप्रिय आहे. होणार सून मी ह्या घरची सुपरडुपर हिट झालेली आणि आता तो आलाय सिद्धार्थ बनून. हे मन बावरे या कलर्स मराठीवरच्या मालिकेतून.  श्री आणि सिद्धार्थ यांमध्ये नक्की काही फरक आहे का?

न्यूज18लोकमतच्या वेबसाइटशी बोलताना शशांकनं सांगितलं, ' श्री आणि सिद्धार्थ या दोन व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत. खरं तर दोघंही श्रीमंत घरातले आहेत. श्री कसा केअरिंग, होमली होता. नम्र होता. सिद्धार्थ थोडा उद्धट आहे. प्रॅक्टिकल आहे. मॅच्युअरही आहे. तो अँगर मॅनेजमेंटही व्यवस्थित सांभाळतो. '

अर्थातच, दोन्ही मालिका पूर्ण वेगळ्या  आहेत. हे मन बावरेची नायिका विधवा आहे. तिचं माहेर आणि सासर अशी दोन कुटुंब आहेत. आणि सिद्धार्थ तिच्या प्रेमात पडतो. शशांक सांगतो, ' पहिल्या मालिकेनं लोकांना नात्यांची आठवण करून दिली होती. एकत्र कुटुंबाचं महत्त्व सांगितलं होतं. हे मन बावरे मालिकेतला सिद्धार्थ माणसावर प्रेम करतो. व्यक्तीच्या निरागसतेवर जीव लावतो. '

या मालिकेत मृणाल दुसानीसची भूमिका आहे. लागोपाठ तीन मालिका हिट देणारी मृणाल आणि शशांक यांची जोडी फ्रेश आहे. पहिल्यांदाच दोघं एकत्र काम करतायत.

शशांकला विचारलं, तू नक्की कसा आहेस? तो म्हणतो, ' मी श्री आणि सिद्धार्थ दोन्हींचं मिक्शर आहे. मी स्वत: नॅशनल स्वीमर होतो. मी स्पोर्ट पर्सन आहे. सिद्धार्थ व्यक्तिरेखेच्या मी खूप जवळ आहे.'

Loading...

शशांकचं गोष्ट तशी गमतीची नाटकाचे प्रयोगही सुरू आहेत. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'अाबालाला अडकित्ते आणि मुमताज महल' हे नाटकही त्यानं केलेलं. तो म्हणतो, ' काव्यात्मक नाटक होतं. एका वेड्या कलाकाराची गोष्ट होती. पण त्याचे प्रयोग फारसे झाले नाहीत. '

शशांक केतकरचा इण्डो फ्रेंच सिनेमाही डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. अॅरोन असं त्याचं नाव आहे. अनेक परदेशी फेस्टिवलमध्ये त्याला अॅवाॅर्डही मिळालेत. शशांक सांगतो, ' सिनेमा पॅरिस आणि बुडापेस्ट इथे शूट केलाय. नेहा जोशी आणि स्वस्तिका मुखर्जी हे बंगली कलाकार सिनेमात आहेत.'

हा कौटुंबिक सिनेमा आहे. पॅरिसमध्ये हरवलेल्या एका वहिनीचा शोध या सिनेमात आहे. शशांकची सिनेमाकडून बरीच अपेक्षा आहे.

सध्या तरी शशांकचा सिद्धार्थ घराघरात पोचतोय. शशांकची रोमँटिक भूमिका अनेक तरुणींच्या हृदयाची धडकन वाढवतेय, एवढं नक्की.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 05:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...