News18 Lokmat

सेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश

शशांक केतकर एक चांगला अभिनेता आहे, हे मालिका, सिनेमातून आपण पाहिलंय. पण त्याचा आणखी एक खास पैलू आहे. सेटवरचे त्याचे सहकलाकार त्याबद्दल सांगतात.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 06:15 PM IST

सेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश

मुंबई, 18 डिसेंबर : सध्या कलर्स मराठीवर सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका सुरू आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस पहिल्यांदाच मालिकेत जोडी म्हणून आलेत. पण शशांकसोबत त्याची बहीण झालेली शर्मिष्ठाही आहे. प्रेक्षकांना या दोघांमधील बहीण भावाचं नातं देखील खूप आवडत आहे.  प्रेक्षकांची त्यालादेखील पसंती मिळत आहे.

सिड आणि संयू यांच्यामधील छोटी मोठी भांडणं, सिडचे संयूला समजवणं हे सर्व पडद्यावर तर आहेच. पण पडद्यामागे देखील यांची बरीच धम्माल मस्ती सुरू असते. मालिकेद्वारे चोवीस तासातला बराचसा वेळ एकत्र रहाता आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखू लागता आणि त्यातून काही सुंदर नाती तयार होतात जी आयुष्यभर तशीच रहातात.

शर्मिष्ठानं शशांकचं एक गुपित सांगितलं. ती म्हणाली,शशांकबरोबर काम करायला खूप मज्जा येते. याआधी मी शशांकला नावाने ओळखत होती, पण मालिकेद्वारे एकमेकांना ओळखायची संधी मिळाली, शशांक एक उत्तम अभिनेता आहे, सीन परफॉर्म करताना त्याची खूप मदत होते.त्याची दुसरी बाजू खूप कौतुकास्पद आहे आणि ती म्हणजे त्याचे स्वत:चे हॉटेल आहे जे तो उत्तमरीत्या सांभाळतो आणि सेटवर देखील तो त्याने तयार केलेल्या बऱ्याच गोष्टी आणतो ज्या अप्रतिम असतात.'

शशांक केतकरचं पुण्यात 'आईच्या गावात' नावाचं हाॅटेल आहे. शिवाय स्वत: चांगला कूक आहे. तो मोमोज आणि नुडल्स उत्तम बनवतो. शिवाय शशांक डोसेही चांगले बनवतो.

शर्मिष्ठाबद्दल बोलताना शशांक केतकर म्हणाला, 'शर्मिष्ठा आणि माझी मैत्री या मालिकेमुळे झाली. बिग बॉस मराठीमुळे मला शर्मिष्ठा कळली, खूप उत्साही आहे, बिनधास्त मुलगी आहे, ज्याच्यावर जीव लावते त्याच्यावर पूर्ण जीव लावते आणि एक मात्र नक्की मी तिच्या आणि ती माझ्या आवडत्या माणसांच्या यादीमध्ये आता हळूहळू येत चाललो आहे.

Loading...


'टायगर' पडला 'ठग्सवर' भारी, बॉक्स ऑफिसवरील 'या' वर्षातले टॉप-5 सिनेमे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...