बिग बाॅस मराठीच्या घरात आता येणार शर्मिष्ठा!

बिग बाॅस मराठीच्या घरात आता येणार शर्मिष्ठा!

हर्षदा खानविलकर हिच्या एंट्रीनंतर आता अजून एक अभिनेत्री बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणारेय आणि ही अभिनेत्री आहे शर्मिष्ठा राऊत.

  • Share this:

२३ मे : बिग बॉस मराठीचा पहिला सिझन सध्या चांगलाच गाजतोय. राजेश श्रृंगारपुरेची घरातून एग्झिट झाल्यानंतर या शोमधली रंगत थोडी कमी होईल असं वाटत होतं. मात्र हर्षदा खानविलकर हिच्या एंट्रीनंतर आता अजून एक अभिनेत्री बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणारेय आणि ही अभिनेत्री आहे शर्मिष्ठा राऊत.

शर्मिष्ठाने यापूर्वी जुळून येती रेशीम गाठीसारखी मालिका आणि कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस अशा काही शोमध्ये काम केलंय. स्वभावाने ती तशी तिखट आहेच. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाऊन ती नक्की काय धमाल करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. मात्र तिच्या येण्याने घरातली समीकरणं नव्याने बदलणार एवढं नक्की.

First published: May 23, 2018, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading