Home /News /entertainment /

Star Pravah वर तब्बल 10 वर्षांनी अभिनेत्री परतणार ; 'या' मालिकेत साकारणार नकारात्मक भूमिका

Star Pravah वर तब्बल 10 वर्षांनी अभिनेत्री परतणार ; 'या' मालिकेत साकारणार नकारात्मक भूमिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या चर्चेत असणारी 'मुलगी झाली हो' या मालिकेत नवा टि्वस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. तब्बल दहा वर्षानीं ही अभिनेत्री या वाहिनीवर नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 23 सप्टेंबर 2021 ; स्टार प्रवाह (Star Pravah serial) वाहिनीवरील सध्या चर्चेत असणारी 'मुलगी झाली हो'  (Mulgi Zali Ho)या मालिकेत नवा टि्वस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. ते पात्र दुसर तिसर कोणी नसुन अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत  (Sharmishta Raut Come Back) आहे. विशेष म्हणजे शर्मिष्ठा या वाहिनीवर तब्बल दहा वर्षांनी परतत आहे. या मालिकेत शर्मिष्ठा निलिमाची भूमिका साकारणार असुन ती यामध्ये व्हिलनच्या म्हणजे नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळे मालिकेत तिच्या एन्ट्रीने नेमकं काय घडणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर शर्मिष्ठा तब्बल दहा वर्षांनी परतणार असुन तिने इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. ''१० वर्षांनी पुन्हा एकदा @star_pravah वर काम करायची संधी मिळाली.. मुलगी झाली हो ह्या मालिकेत कॅमिओ करत आहे.. म्हणजेच गेस्ट ऑपिअरन्स करत आहे.. भूमिका खूपच वेगळी आहे.. जस माझ्या यापूर्वी साकारलेल्या भूमिकांना प्रेम दिलत तस ह्या पण भूमिकेला तुमचे आशिर्वाद मिळू दे.. थँक्यू'' , अशी पोस्ट करत शर्मिष्ठाने साकरणाऱ्या निलिमाचा रोलचा फोटो पोस्ट केला आहे. वाचा : Bigg Boss15: 'उतरन' फेम टीना दत्ताची बिग बॉसमध्ये होणार एन्ट्री!अभिनेत्रीच्या पोस्टने केला खुलासा सध्या माऊने सिद्धांत सोबत लग्नासाठी नकार दिला असून लग्न करेन तर शौनकशी असे ठामपणे सांगितले आहे. माऊने जरी लग्नासाठी नकार दिला असला तरी सिद्धांत हार मानायला तयार नाही. नीलिमाचा वापर करुन तो माऊचे वडील म्हणजेच विलास पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणार आहे. सिद्धांत आणि नीलिमाचा डाव यशस्वी होणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेलच. नीलिमा सावंत या भूमिकेच्या निमित्ताने शर्मिष्ठाचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
  शर्मिष्ठा राऊत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये शर्मिष्ठा झळकली असून तिची लोकप्रियता प्रचंड असल्याचं पाहायला मिळते. शर्मिष्ठा यापूर्वी, 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत दिसली होती. मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिने काम केले आहे. 'जो भी होगा देखा जयेगा', 'टॉम अँड जेरी', 'बायको असून शेजारी', 'शंभू राजे' या नाटकात शर्मिष्ठाने काम केले आहे. तसेच, दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील ती झळकली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या