Home /News /entertainment /

सुशांतच्या कंपनीसह शेअर्स, FD बाबत 10 तास सुरू होती रिया आणि शौविकची चौकशी

सुशांतच्या कंपनीसह शेअर्स, FD बाबत 10 तास सुरू होती रिया आणि शौविकची चौकशी

सुशांतच्या अकाऊंटपासून ते त्याची FD याबाबत रिया आणि भावाची चौकशी करण्यात आली

    मुंबई, 10 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची आज ईडी कार्यालयात तब्बल 9.30 तास चौकशी सुरू होती. शौविकची यापूर्वी 18 तास आणि आज 10 तास चौकशी करण्यात आली. प्रॉपर्टीबाबत ईडीने दोघांची कडक चौकशी केली. ईडीला मिळालेल्या माहितीनुसार सुशांतच्या फंडवर रियाचं नियंत्रण होतं. रियाला सुशांतच्या पैशांबाबत प्रश्न विचारण्यात आले. रियाने ईडी समोर आपल्या खर्चाचा पुरावा देण्यासाठी कागदपत्रं सादर केली, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही पुराव्यातून ईडी अधिकारी समाधानी झाले नाही. कमी उत्पन्न असतानाही रियाने 76 लाख रुपयांचे शेअर्स कसे खरेदी केले याचा ईडीकडून तपास केला जात आहे. याशिवाय सुशांतच्या अकाऊंटमधून 15 कोटी रुपयांचा फेरफार केल्याचा आरोप रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर होता, मात्र याबाबत ठोस पुरावे हातील लागलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या वडिलांनी रिया आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप लावला आहे, मात्र अद्याप ही गोष्ट स्पष्ट होण्याइतके पुरावे मिळू शकले नाही. रियाने ईडीला सांगितले की सुशांतच्या अकाऊंटमधील 2.78 कोटी रुपये जीएसटी आणि इनकम टॅक्समध्ये कापले गेले आहे. तर अशी माहिती समोर आली होती की सुशांतने आपली बहिणीच्या नावावर साडे चार कोटी रुपयांची एफडी केली होती. मात्र रियाच्या 2 सीएंच्या अकाऊंटमध्ये या एफडीमधील 2.78 कोटी ट्रान्सफर करण्यात आले होते. ईडीने रियाला बँक अकाऊंट, कंपनी आणि अन्य प्रॉपर्टीचे कागदपत्रं घेऊन बोलावले होते. यावेळी ITR संबंधित कागदपत्रांचीही चौकशी करण्यात आली. ही सर्व कागदपत्रं ईडीने ताब्यात घेतली आहेत. हे वाचा-PHOTOS 'नव्या आयुष्याची सुरुवात'; अंकिता लोखंडेच्या घरात जुळ्या पाहुण्यांचं आगमन सुशांतच्या एका पेटंट केलेल्या कंपनीत रिया आणि शौविक संचालक होते. पेटंटमध्ये कायदेशीर राइट्स रिया, शौविक आणि सुशांतचे होते. म्हणजे जर पेटंटची विक्री केली तर कोटी रुपयांची कमाई करता येऊ शकते. अशात सुशांतच्या आत्महत्येनंतर लीगल राइट्स रिया आणि शौविकचे आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. खरं पाहता ही कंपनी सुशांतने सुरू केली होती, मात्र या कंपनीवर मालकी हक्क आणि स्वाक्षरी शौविक चक्रवर्तीचे होती. ईडीने या प्रकरणातही आज चौकशी केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या