• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'कुंडली भाग्य' फेम प्रीताच्या रिअल करणची फर्स्ट झलक आली समोर; लग्नाच्या VIRAL VIDEO मध्ये दिसला रोमँटिक अंदाज

'कुंडली भाग्य' फेम प्रीताच्या रिअल करणची फर्स्ट झलक आली समोर; लग्नाच्या VIRAL VIDEO मध्ये दिसला रोमँटिक अंदाज

टीव्ही अभिनेत्री (Tv Actress) श्रद्धा आर्या (Sharddha Arya) 16 नोव्हेंबरच्या रात्री राहुल शर्मासोबत (Rahul Sharma) लग्नाच्या (Wedding) बेडीत अडकली आहे. श्रद्धाच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर-   टीव्ही अभिनेत्री   (Tv Actress)  श्रद्धा आर्या   (Sharddha Arya)  16 नोव्हेंबरच्या रात्री राहुल शर्मासोबत (Rahul Sharma)  लग्नाच्या  (Wedding)   बेडीत अडकली आहे. श्रद्धाच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. यासोबतच तिच्या पतीचा पहिला फोटोही समोर आला आहे. या फोटो आणि व्हिडिओमध्ये श्रद्धा खूप आनंदी दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये श्रध्दा स्टेजवर येताना दिसत आहे आणि अनेक महिला तिच्या डोक्यावर ओढणी घेऊन चालत आहेत. तिची स्टेजवरील अनेक छायाचित्रेही समोर आली आहेत. या फोटोंमध्ये दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत आहे.दोघांची सुंदर बाँडिंग पाहायला मिळत आहे.
  श्रद्धा आर्याच्या लग्नाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा पती राहुल शर्मा तिला उचलून घेताना दिसत आहे. हे पाहून उपस्थित लोक खूप आनंदी होत आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत. कुटुंब आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत श्रद्धा आर्यने दिल्लीत लग्न केले. शशांक व्यास, अंजुम फाखी आणि टीव्ही इंडस्ट्रीतील तिचे मित्र लग्नाला उपस्थित होते.
  श्रद्धा आणि राहुलचे स्टेज फोटो देखील समोर आले आहेत. यामध्ये श्रद्धा आर्या लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसत आहे. यासोबत तिने भरगच्च दागिने घातले आहेत. तिने मांग-टिका आणि नथही घातली आहे. त्याचवेळी राहुल पांढरी शेरवानी आणि लाल पगडी मध्ये दिसत आहे. यावेळी दोघेही एकमेकांचा हात धरताना दिसले. दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत होती. याशिवाय श्रद्धा आर्या आणि राहुल शर्मा यांचा आणखी एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये दोघेही स्टेजवर सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. श्रद्धा प्रेमाने तिचा गाल ओढत आहे आणि राहुल श्रद्धाकडे बघत आहे. राहुल शर्मा हे दिल्लीचे रहिवासी आहेत आणि भारतीय नौदलात अधिकारी आहेत. हे दोघेही फॅमिली फ्रेंड आहेत. राहुल सोशल मीडिया आणि शोबिझपासून दूर राहणे पसंत करतो. विशेष म्हणजे हे लग्न ठरलेलं होतं, ज्याचं रूपांतर प्रेमात झालं. श्रद्धा आर्याचे दिल्लीतील अंदाज हॉटेलमध्ये लग्न झाले. श्रद्धाच्या लग्नात येणार्‍या पाहुण्यांच्या यादीत फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांचा समावेश होता. कारण या जोडप्याला त्यांच्या लग्नात फारसा झगमगाट नको होता. श्रद्धाने तिच्या करिअरची सुरुवात २००४ मध्ये 'इंडिया बेस्ट सिनेस्टार की खोज'मध्ये स्पर्धक म्हणून केली होती. तिने 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की', 'तुम्हारी पाखी', 'ड्रीम गर्ल', 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य' सारख्या शोमध्ये काम केले आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: