कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन शरद पोंक्षेंचं रंगभूमीवर कमबॅक

कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन शरद पोंक्षेंचं रंगभूमीवर कमबॅक

Sharad Ponkshe - अभिनेता शरद पोंक्षे यांना कॅन्सर झाला होता. त्यातून ते बरे झाले. जाणून घेऊ त्यांनी कसा केला संघर्ष?

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : दिग्दर्शक राजेश देशपांडे हिमालयाची सावली हे प्रा. वसंत कानेटकरांचं नाटक रंगभूमीवर घेऊन येतायत. नाटकात अभिनेते शरद पोंक्षे यांची महत्त्वाची भूमिका आहे. म्हटलं तर त्यांचा हा कमबॅक आहे. पण बातमी इतकीच नाही. शरद पोंक्षे पुन्हा रंगभूमीवर परत येत आहेत ते हिमालयाएवढी झुंज देऊन. तीही कॅन्सरशी.

शरद पोंक्षे तालमीसाठी आले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शरद पोंक्षे गेले सहा महिने कॅन्सरवर उपचार करत होते. एका मुलाखतीत ते म्हणाले, 'डिसेंबरमध्ये मला ताप येऊ लागला. रोज संध्याकाळी ताप यायचा. नंतर कळलं कंबरेत गाठी झाल्यात. त्याचं निदान झालं कॅन्सर.'

Bigg Boss Marathi 2- अभिजीत केळकर घरातून गायब, स्पर्धकांना दिला सावधतेचा इशारा

शरद पोंक्षे म्हणतात, हे कळल्यावर मी सुन्न झालो. कॅन्सरचं नाव कळलं की समोर येतो तो मृत्यूच. मी पहिले सहा दिवस ही बातमी घरात सांगितलीच नव्हती. ' सतत शूटिंगमध्ये बिझी असलेल्या शरद पोंक्षेंना सगळं थांबवावं लागलं होतं.

 

View this post on Instagram

 

#marathiclassicplay#himalayachisawali

A post shared by Rajesh Deshpande (@rjsh.deshpande) on

ते म्हणतात, 'तुम्ही जेव्हा तो आजार स्वीकारता, तेव्हा त्याच्याशी लढायची शक्ती मिळते.'

या काळात शरद पोंक्षे यांनी जाणीवपूर्वक ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. त्यांना कुणाची सहानुभूती नको होती. सोनाली बेंद्रे, इरफान खान यांच्या उपचाराच्या बातम्या ते वाचत होते. या सहा महिन्यात त्यांच्यावर केमो थेरपी झाली. कॅन्सरमधून ते पूर्ण बरे झाले आणि आता नाटकाच्या तालमी सुरू केल्या.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सोयरा मातोश्री 'असं' घेतात प्रायश्चित्त

या सहा महिन्यात त्यांनी खूप वाचन केलं. ते सावरकर प्रेमी आहेत. ते सांगतात, सावरकरांनी 11 वर्ष एका छोट्या खोलीत काढली होती. मला तर काही महिने काढायचे होते. सावरकरांच्या पुस्तकांनी त्यांना प्रेरणा दिली. याच काळात त्यांनी हिमालयाची सावली हे नाटकही वाचलं. आता ते कॅन्सरशी यशस्वी झुंज देऊन परत रंगमंचावर आलेत.

शरद पोंक्षे यांचं मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक खूप गाजलं. आता अग्निहोत्र 2 या मालिकेत ते पुन्हा दिसणार आहेत.

VIDEO : मनसेला आघाडीत घेण्याची चर्चा? जयंत पाटील म्हणतात...

First published: July 17, 2019, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading