मुंबई, 06 डिसेंबर : गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीत ज्या सिनेमावरून वादंग निर्माण झाला तो सिनेमा म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात. सिनेमाचा फर्स्ट लुक लाँच झाल्यापासून सिनेमा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लुक समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार यांना चांगलंच ट्रोल केलं. आधीच ट्रोलिंग कुठे तरी थांबतय तोवर अक्षय कुमारचा सिनेमातील महाराजांच्या भूमिकेतील एक सेटवरील एक व्हिडीओ समोर आला. ज्यानं पुन्हा एकदा अक्षय कुमार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. मात्र एकीकडे अक्षयला ट्रोल करत असताना दुसरीकडे मात्र अभिनेता शरद केळकर ट्विटवर ट्रेंडिगमध्ये होता. शरद केळकर ट्विटरवर ट्रेंड होण्याचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया.
वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमातील अक्षय कुमारचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अक्षयला चांगलीच चपराक दिली. 'रणवीर सिंहनं तुझ्यापेक्षा चांगलं काम केलं असतं'. तसंच 'हा लुक परफेक्ट नाही'. इतकंच नाही तर 'अक्षय कुमार आता तू काम करणं बंद कर' असंही म्हणण्यात आलं. एकीकडे ट्रोलिंग सुरू असताना दुसरीकडे अभिनेता शरद केळकर आणि अक्षय कुमार यांची तुलना सुरू झाली. 'शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चांगली करू शकतो', असं अनेकांनी म्हटलं आहे. शरद केळकरनं तान्हाजी सिनेमात महाराजांची भूमिका साकारली होती आणि त्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुकही केलं होतं.
Which one you prefer? Like for Akshay Kumar RT for Sharad Kelker#AkshayKumar #sharadkelkar pic.twitter.com/F7CuvNVt2c
— 🎻SP (@Your_Summy_) December 6, 2022
हेही वाचा- Vedat Marathe Veer Daudale Sat : अक्षय कुमार महाराजांच्या भूमिकेत; कोण आहेत ते सात मावळे? पाहा
शरद केळकर सध्या ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे. 'महाराजांच्या वेशात कोण सरस? शरद केळकर की अक्षय कुमार', अशी पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. त्यावर लाखो लोक आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. शरद केळकरनं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम, हार्दीक जोशी, सत्या मांजरेकर, विराट मडके हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.