Home /News /entertainment /

'हा अभिमान काही निराळाच' शरद केळकरला आली तान्हाजी सिनेमातल्या भूमिकेची आठवण

'हा अभिमान काही निराळाच' शरद केळकरला आली तान्हाजी सिनेमातल्या भूमिकेची आठवण

‘तान्हाजी:द अनसंग वॉरियर’ (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटामध्ये अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेचा एक फोटो शरद केळकरने शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनची सध्या चर्चा सुरू आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 02 डिसेंबर: अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) हा सिनेसृष्टीतला एक गुणी कलाकार. त्याच्या वाट्याल्या आलेल्या सगळ्याच भूमिकांचं तो सोनं करतो. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या लक्ष्मी (laxmii) या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण त्यातली शरद केळकरची भूमिका प्रचंड गाजली. कमी वेळ पडद्यावर राहुनसुद्धा शरद केळकर भाव खाऊन गेला. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीच्या भूमिकांपेक्षा त्याच्याच कामाचं कौतुक झालं. शरद केळकरच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आदर आहे. त्याने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. शरद केळकरने ‘तान्हाजी:द अनसंग वॉरियर’ (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला शरदने चांगला न्याय दिला होता. शरदने नुकताच या चित्रपटातील वेशातला एक फोटो शेअर केला आहे. शरदने फोटोला कॅप्शन दिलं आहे, ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अवतारात पहिल्यांदा येण्याचा अभिमान काही निराळाच होता’  या फोटोवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तान्हाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटामध्ये तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा दाखवण्यात आली होती.
  शरद केळकरने आत्तापर्यंत लय भारी, मोहेंजोदारो, लक्ष्मी, सरदार गब्बर सिंह, भूमि, राक्षस, रामलीला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच अनेक वेब सीरिज आणि मालिकांमध्येही शरद झळकला आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Marathi entertainment, Viral photo

  पुढील बातम्या