मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: अभिनयच नव्हे तर या कलेतही शरद केळकर आहे पारंगत; अवघ्या 10 मिनिटांत बनवला बाप्पा

VIDEO: अभिनयच नव्हे तर या कलेतही शरद केळकर आहे पारंगत; अवघ्या 10 मिनिटांत बनवला बाप्पा

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा (Ganesha Idol) वापर करण्याचं शरदने ठरवलं होतं मात्र यावेळी त्याने स्वत:च्या हाताने त्याच्या घरी बाप्पाची इको फ्रेंडली मुर्ती बनवली आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा (Ganesha Idol) वापर करण्याचं शरदने ठरवलं होतं मात्र यावेळी त्याने स्वत:च्या हाताने त्याच्या घरी बाप्पाची इको फ्रेंडली मुर्ती बनवली आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा (Ganesha Idol) वापर करण्याचं शरदने ठरवलं होतं मात्र यावेळी त्याने स्वत:च्या हाताने त्याच्या घरी बाप्पाची इको फ्रेंडली मुर्ती बनवली आहे.

मुंबई 4 सप्टेंबर : लवकरच सगळीकडे गणपतीबाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोनाचे निर्बंध याही वर्षी असले तरी भक्तगन निर्बधांत राहूनही मनोभावे पूजाअर्चना करताना दिसतात. लवकरच अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होणार आहेत. बाप्पा आला म्हणजे सजावट, आनंदी वातावरण, नैवेद्य आणि मोदक हे आलेच. परंतु या आधी सर्वात पहिला विचार अनेकांच्या मनात येतो तो म्हणजे ‘यंदाच्या वर्षीचा माझा बाप्पा कसा असायला हवा?’ प्रत्येकाच्या घरी वेगळ्या मूर्तीची, सजावटीची आरास असते. तर अनेकांना हाताने मुर्ती बनवण्याचाही छंद असतो.

असाच विचार अभिनेता शरद केळकरनेही (Sharad Kelkar) केलाय. ते म्हणजे, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा (Ganesha Idol) वापर करण्याचं शरदने ठरवलं होतं मात्र यावेळी त्याने स्वत:च्या हाताने त्याच्या घरी बाप्पाची इको फ्रेंडली मुर्ती बनवली आणि ती देखील फक्त 10 मिनिटांतच. आहे की नाही हे विशेष कारण?  10 मिनिटांमध्ये बाप्पाची मूर्ती बनवणं हे शक्य तरी आहे का, हा विचारच मुळात सोप्पा वाटत नाही, पण शरद केळकरने ते शक्य करुन दाखवलं.

" isDesktop="true" id="600651" >

दमदार आवाज आणि जबरदस्त अभिनय अशी शरद केळकरची ओळख, मात्र आता त्याच्यातील सुप्त गुण बाप्पाच्या निमित्ताने सर्वांना कळलाय. त्याच्या या कलाकारीमध्ये त्याला शिल्पकार, क्ले आर्टिस्ट शुभांकर कांबळेचं मार्गदर्शन लाभलं. त्याच्या मार्गदर्शनाखाली शरदने मूर्ती साकारली असून अवघ्या 10 मीनिटांत त्याने बाप्पा तयार केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

त्यामुळे अभिनयात तर शरद अव्वल आहेच मात्र त्याच्याकडे इतर कलाही आहेत. अनेकदा तो सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ देखील शेअर करत असतो. त्यामुळे जितक्या गंभीर भूमिका त्याने साकारल्या तितक्याच विनोदी भूमिका देखील तो करू शकतो. सध्या शरद त्याच्या आगामी चित्रपटांंमध्ये व्यस्त आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment