मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अमिषा पटेलचं INSTAGRAM अकाऊंट हॅक; सायबर सेलने सर्वच युजर्सना दिला 'हा' इशारा  

अमिषा पटेलचं INSTAGRAM अकाऊंट हॅक; सायबर सेलने सर्वच युजर्सना दिला 'हा' इशारा  

आजकाल सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचा प्रमाण वाढलं आहे. अभिनेत्री अमिषा पटेलच्या (Ameesha Patel) बाबतीतही असाच प्रकार घडला. तिच्या Instagram अकाऊंटवर एक लिंक आली आणि तिचं अकाऊंट हॅक झालं.

आजकाल सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचा प्रमाण वाढलं आहे. अभिनेत्री अमिषा पटेलच्या (Ameesha Patel) बाबतीतही असाच प्रकार घडला. तिच्या Instagram अकाऊंटवर एक लिंक आली आणि तिचं अकाऊंट हॅक झालं.

आजकाल सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचा प्रमाण वाढलं आहे. अभिनेत्री अमिषा पटेलच्या (Ameesha Patel) बाबतीतही असाच प्रकार घडला. तिच्या Instagram अकाऊंटवर एक लिंक आली आणि तिचं अकाऊंट हॅक झालं.

मुंबई 06, जानेवारी: सेलिब्रिटी आजकाल चित्रपटांमध्ये काम करत नसले तरी सोशल मीडिया अकाऊंटमुळे लाइमलाइटमध्ये येतात. इनस्टाग्रामचे युजर्स वाढलेत म्हणून की काय आता हॅकर्सनी आपला मोर्चा इनस्टाग्रामकडे वळवलाय असं म्हणटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण महाराष्ट्र सायबर सेलने एक इशारा जारी केला आहे. त्यानुसार तुम्ही इनस्टाग्रामच्या काॅपीराईट नियमांचे उल्लंघन केले आहे असा मेल किंवा मॅसेज हॅकर्स इनस्टाग्राम युजर्सना पाठवत आहेत आणि त्या भितीपोटी इनस्टाग्राम युजर्स त्या मेल किंवा मॅसेजला रिप्लाय करतात आणि स्वत:ची फसवणूक करुन घेतात. कारण त्या मेल किंवा मॅसेज मध्ये असलेली लिंक किंवा विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून तुमचा इनस्टाग्रामचा पासवर्ड हॅकरला कळतो तसच तो तुमचा खाजगी डेटा आणि बॅंकेची माहिती चोरून तुमची फसवणूक करतो.

असाच प्रकार घडला आहे, अभिनेत्री अमिषा पटेलसोबत (Ameesha Patel). 4 जानेवारीला अमिषाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर Account will be suspended within 24 hours for violating Instagram’s Copyright Law” हा मॅसेज आला होता.  हा फिशिंग प्रकारचा सायबर गुन्हा आहे असे प्रथमदर्शनी भासत होते. कारण हा इंस्टाग्रामकडूनच आल्याचे भासविण्यात आले होते. तसेच मेसेज बरोबर Copyright Objection Form असा मॅसेज लिहून एक लिंक पण देण्यात आली होती. या लिंकवर सदर अभिनेत्रीने घाबरून क्लिक केले व तिला एका तोतया इंस्टाग्राम वेबसाईटवर डायरेक्ट केले गेले व लगेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट लॉक झाले. महाराष्ट्र सायबरने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अभिनेत्रींचे अकाउंट पूर्ववत करण्यासाठी तिची परवानगी घेतली व तात्काळ तपास सुरु केला असता हँकरने ते अकाउंट लॉक केले होते व त्यामधील पोस्ट्स डिलीट केल्या होत्या.

तपास करताना असे निदर्शनास आले की मेसेज मध्ये दिलेली लिंक ही एका नेदरलॅंडमधील तर IP ADDRESS हा तुर्कस्थान मधील होता, यावरून सदर गुन्ह्याचे गांभीर्य आणि किचकटपणा समोर आला. या गुन्ह्याचे गंभीर परिणाम होऊ शकतो याचा विचार करून व पुढील परिणाम टाळण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलची टीम हॅकरचा शोध घेवू लागली. त्यांनी लगेच इंस्टाग्रामच्या नोडल ऑफिसला संपर्क करून पाठपुरावा करून अकाउंट काही वेळातच रिकव्हर करून दिले.

अशाच प्रकारची घटना अभिनेता शरद केळकर यांच्या बाबतदेखील घडली होती. त्या वेळेसही महाराष्ट्र सायबर सेलने शरद केळकर यांचे अकाऊंट रिकव्हर करून दिले होते. हा सर्व तपास महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलिसांच्या टीमने अत्यंत कमी कालावधित तपास पूर्ण केला.

सायबर तज्ज्ञ रितेश भाटिया यांच्या मते या फिशिंग प्रकरणात युजरकडून मिळवलेला डाटा दहशतवाद्यांनाही विकला जाऊ शकतो. हॅकर्स केवळ सेलिब्रिटींच्या इन्स्टा अकाउंट्सना लक्ष्य करत नाहीत, तर एखाद्या जास्त फॉलोवर्स असलेल्या सामान्य व्यक्तीचं खातंही त्यांच्यासाठी या उपयोगात येऊ शकतं. ही हॅक अकाउंट्स मग डार्क वेबवर विकले जातात. त्यामुळे प्रत्येक युजरने काळजी घेऊन कोणत्याही लिंक विचार न करता ओपन करू नये. असा इशारा सायबर सेलने दिला आहे.

First published:

Tags: Instagram