हॉटेल स्टाफच्या गायिकीवर शंकर महादेवन झाला फिदा, शेअर केला व्हिडिओ

हॉटेल स्टाफच्या गायिकीवर शंकर महादेवन झाला फिदा, शेअर केला व्हिडिओ

पण आज बंगळुरूमध्ये अशीच एक गोष्ट घडलीय. बाॅलिवूडचा गायक शंकर महादेवनने आज त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : भारतात अनेक टॅलेंटेड लोक आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येक चॅनलवर गाण्याचे रिआलिटी शो घेतले जातात. या शोमध्ये सामान्य लोकांना गाण्याची संधी दिली जाते. पण अनेक असे गायक आहेत ज्यांना रिअलिटी शोमध्ये येण्याची संधी मिळाली नाही किंवा त्यांच्या वेगळ्या प्रोफेशनमुळे त्यांना गाण्याची संधी मिळाली नाही.

पण आज बंगळुरूमध्ये अशीच एक गोष्ट घडलीय. बाॅलिवूडचा गायक शंकर महादेवनने आज त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये बंगळुरूत एका हॉटेलमधले स्टाफ मेंबर्स गाणं गाताना दिसत आहेत. एका तरुणीने मोनाली ठाकूरचं ये मोह मोह के धागे हे गाणं गायलं तर तरुणाने शंकर महादेवनचं मितवा हे गाणं गायलं.

हे दोघं इतकं चांगलं गातात हे कळताच शंकर महादेवनने त्याचा व्हिडिओ केला. जेव्हा शंकर या हॉटेलमधून चेकआऊट करत होता तेव्हा त्याने हा व्हिडिओ केला होता. ट्विटरवर व्हिडिओ शेअर केल्यावर त्याने लिहिलंय, ‘या दोन स्टाफ मेंबर्सचं गाणं ऐकून तुमच्यासोबत शेअर करण्याची इच्छा झाली.’ शंकर स्वतः एक गायक असल्यामुळे या दोन गायकांची त्याला लगेच पारख झाली.

शंकर महादेवननं कौतुक केल्यामुळे दोघांना खूपच आनंद झाला. शंकर महादेवन आपल्या दिलखुलास स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक रिअॅलिटी शोजमध्ये ते स्पर्धकांना मनापासून दाद देताना दिसतात. त्यामुळे नवोदितांना प्रोत्साहन मिळतं एवढं नक्की.

TRP : एकता कपूरसमोर टिकू शकले नाहीत बिग बी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2018 07:20 PM IST

ताज्या बातम्या