मुंबई, 26 मार्च- संजय कपूर आणि महीप कपूरची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. शनाया बॉलिवूड डेब्यू करण्यापूर्वीचं कोणत्या कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सध्या स्टार कि़ड्स शनाया कपूर एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. पहिल्यांदा रॅम्प वॉक करणं शनायाला चांगलच महागात पडलं आहे. नेटकऱ्यांनी तिला वाईट पद्धतीनं ट्रोल केलं आहे.
नुकतीच शनाया कपूर FDCI लॅकमे फॅशन वीकमध्ये (Lakme Fashion Week) मनीष मव्होत्राच्या (Manish Malhotra) कलेक्शन डिफ्यूजसाठी शो-स्टॉपर बनली. शनायाने डेब्यूसाठी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत (Siddhant Chaturvedi) रॅम्प वॉक केला. यावेळी तिनं हाय स्लिटवाला ब्रायट पर्पल-पिंक शिमरी बॉडीकॉन बॅकलेस ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा अंदाज आवडलेला दिसत नाही. तिचा रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरू केलं. डक वॉकिंग....असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला.
वाचा-खरंच! स्वप्नील जोशी वापरतो या कंपनीचं सीमकार्ड; VIDEO तून केला खुलासा
नेटकऱ्यांनी केल्या अशा काही कमेंट
शनायाचा कपूरचा व्हिडिओ पाहून एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ठीक आहे.....कारण सध्या तिला रॅम्पवर कसं चालायचं असतं हेच माहिती नाही. तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, शनायाचा रॅम्प वॉक मात्र खूपच मजेशीर आहे. तर आणखी एकाने देखील अशीच कमेंट करत म्हटलं आहे की, हिला बदकासारखं चालायला नेमकं झालंय तरी काय? तर एकाने तिला अभिनेत्री सुष्मिता सेनकडून ट्रेनिंग घेण्याचा सल्ला दिला आहे. तर एकानं म्हटलं आहे की, मनीष मल्होत्रा पहिल्यांदा तिला चालायला शिकवा....अशा अनेक कमेंट तिच्या या व्हिडिओवर आल्या आहेत. नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगल धारेवर धरल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
सिद्धांत आणि शनाया दिसत होते खूपच आनंदात
सिद्धांत आणि शनाया शो टॉपर बनले होते. यावेळी रॅम्पवर मनीष मल्होत्रासोबत दोघांनीही खूप पोझ दिल्या व फोटो काढले. सिद्धांत आणि शनाया यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. दोघांच्या चेहऱ्यावर हा आनंग सरळ सरळ दिसत होता. सिद्धात यावेळी म्हणाला की, हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. लॅकमे फॅशन वीकमध्ये हा माझा पहिलाच रॅम्प वॉक होता. तोपण मनीश मल्होत्रासोबत. माझ्यासाठी खूपच हे अभिमानास्पद असल्याचे त्याने यावेळी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.