शनाया आणि ईशाचा नवा प्लॅन तुम्हाला माहितीय?

शनाया आणि ईशाचा नवा प्लॅन तुम्हाला माहितीय?

आता ही सर्व टेंशन्स, तणाव नाहीसे करायला शनाया आणि ईशा सज्ज झाल्यात. त्या आता नवी इनिंग खेळणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 आॅगस्ट : सध्या 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत खूप टेंशन्स सुरू आहेत. शनायाला तर आता राहायला घरच नाहीय. गुरू पुन्हा एकदा राधिकाच्याच आश्रयाला येऊन राहिलाय. अर्थात, त्यामागे त्याचा डाव आहे, हे वेगळं सांगायला नकोच. पण हल्ली शनाया आणि तिची मैत्रीण ईशा एकमेकींना भेटत नाहीत. ईशाकडेच बरेच दिवस शनाया राहात होती. दोघींची मैत्रीही घट्ट झाली होती. पण आता ही सर्व टेंशन्स, तणाव नाहीसे करायला शनाया आणि ईशा सज्ज झाल्यात. त्या आता नवी इनिंग खेळणार आहेत.

आपल्या हटके अंदाजात कटकारस्थान करत धमाल उडवून देणाऱ्या शनाया आणि ईशा यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहेच. आपला दोस्ताना कायम ठेवत पुन्हा एकदा बदमाशियां करण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. फक्त आता त्यांचा हा दोस्ताना येऊ घातलेल्या ‘यू अँड मी’ या नव्या व्हिडिओ अल्बमसाठी आहे.

जरा सा कट्टा टाकू आता... जरासी बाते तेढीमेढी...

थोडासा किस्सा करू आता...  थोडीशी यादे तेरी मेरी...

करू आम्ही मनमानिया... ऐसी है अपनी यारीया...

असं म्हणत रसिका सुनील आणि आदिती द्रविड, आपला गहिरा दोस्ताना या अल्बमच्या माध्यमातून दाखवणार आहेत. या दोघींचा ‘यू अँड मी’ हा नवा कोरा अल्बम लवकरच प्रेक्षक भेटीस येत आहे.  व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे.

या गाण्याची खासियत म्हणजे स्वत: आदिती द्रविड हिने हे गाणं लिहिलं असून आदिती आणि रसिकानेच हे गाणं गायलं आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाच्या गायकीची नवी ओळख प्रेक्षकांना होणार आहे. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. फुलवा खामकर हिने या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा इथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत.

रसिका आणि आदितीचे हे नवे सूर प्रेक्षकांना आवडतात का, हे लवकरच कळेल. 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये दोघींची नकारात्मक प्रतिमा आता सुरेली होणार, असं वाटतंय.

साखरपुड्यानंतर प्रियांका आणि निक अमेरिकेत करतायत एंजाॅय, फोटोज व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2018 02:11 PM IST

ताज्या बातम्या