विमानात शम्मी कपूर गुणगुणत होते हे मराठी गाणं... VIDEO शेअर करून खुद्द लतादीदींनी सांगितली आठवण

विमानात शम्मी कपूर गुणगुणत होते हे मराठी गाणं... VIDEO शेअर करून खुद्द लतादीदींनी सांगितली आठवण

शम्मी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी शम्मी कपूर यांचा एक किस्सा सांगितला आहे. शम्मी कपूर यांचा अभिनय, त्यांचा डान्स आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर: चाहे कोई मुझें जंगली कहें…हे गाणं ऐकलं की आठवतो एक देखणा चेहरा…बरोबर ओळखलंत…अशी अनेक गाणी असे अनेक चित्रपट चालले शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांच्या नावावर. दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचा आज जन्मदिवस. आजही त्यांनी अजरामर केलेल्या कलाकृती चाहत्यांच्या काळजात घर करुन आहेत. त्यांच्या जन्मदिनानिमित्त ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे.

लता मंगेशकर यांनी एक ट्विट शेअर करत शम्मी कपूर यांचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांनी लिहलं आहे, “मी एक दिवस दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास करत होते. विमानात बसलेली असताना मी ऐकलं की माझं एक मराठी गाणं कोणीतरी अतिशय सुरेल आवाजात गात होतं.आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द शम्मीजी होते. असं गाणं हिंदीमध्ये सुद्धा यायला हवं असं शम्मी कपूर म्हणाले”

शम्मी कपूर गात होते ते गाणंही लतादीदींनी शेअर केलं आहे.

शम्मी कपूर यांचं खरं नाव समशेर राज कपूर असं होतं. वागण्या-बोलण्याची विशिष्ठ ढब, डान्सची एक खास शैली यामुळे शम्मीजींना कधी नृत्य दिग्दर्शकांची गरजच भासली नाही. आजची त्यांच्या कलाकृती चाहत्यांच्या मनामध्ये घर करुन आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 21, 2020, 7:12 PM IST

ताज्या बातम्या