मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raqesh Bapat ने खरेदी केली Audi Q7, आलिशान कारसाठी अभिनेत्याला मोजावे लागले इतके रुपये

Raqesh Bapat ने खरेदी केली Audi Q7, आलिशान कारसाठी अभिनेत्याला मोजावे लागले इतके रुपये

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राकेश बापट  (Raqesh Bapat) बिग बॉस ओटीटीपासून (Bigg Boss OTT) सतत चर्चेत असतो.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) बिग बॉस ओटीटीपासून (Bigg Boss OTT) सतत चर्चेत असतो.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) बिग बॉस ओटीटीपासून (Bigg Boss OTT) सतत चर्चेत असतो.

  मुंबई, 11 फेब्रुवारी-  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राकेश बापट   (Raqesh Bapat)  बिग बॉस ओटीटीपासून (Bigg Boss OTT)  सतत चर्चेत असतो. अभिनेत्याचा हा व्हॅलेंटाइन वीक  (Valentine Week)  खूप खास आहे. कारण त्याने स्वतःला एक नवीन आलिशान कार भेट केली आहे. अर्थात राकेशने नवी कार खरेदी केली आहे. आपल्या नव्या कारचा लुक उघड करत त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. राकेशने त्याच्या कार कलेक्शनमध्ये नवीन Audi Q7 चा समावेश केला आहे. अभिनेता राकेश बापटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. राकेश बापटने त्याच्या आईसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची नवी कार दिसून येत आहे.हा व्हिडीओ पाहून चाहते अभिनेत्याचं ऑडी Q7 साठी अभिनंदन करत आहेत.राकेशवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ जोरदार व्हायरलदेखील होत आहे. कारसाठी अभिनेत्याने मोजले इतके रुपये- ऑडी इंडियाने Q7 दोन उत्कृष्ट प्रकारांमध्ये सादर केलं आहे. ज्यामध्ये ऑडी Q7 प्रीमियम प्लस व्हेरिएंटची किंमत 79.99 लाख रुपये इतकी आहे. आणि ऑडी Q7 टेक्नॉलॉजी व्हेरिएंटची किंमत 88.33 लाख रुपये इतकी आहे. राकेश बापट अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. तसेच तो अनेक रिएलिटीशोमध्ये सुद्धा दिसून आला होता. काही दिवसांपूर्वी राकेश बिग बॉस OTT मध्ये सहभागी झाला होता. या शोमुळे प्रचंड चर्चेत आला होता. बिग बॉस OTT च्या घरात अभिनेत्याची शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत जवळीक निर्माण झाली होती. त्यांनी घरात एकेमकांबद्दल आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या होत्या. सोबाबतच बिग बॉस OTT च्या घरातून बाहेर गेल्यानंतर एकेमकांना भेटणार असल्याचा खुलासादेखील केला होता. त्यांनतर ते एकमेकांना डेट करू लागले आहेत. (हे वाचा:Sayali Sanjeev च्या घरी झालं गोड पाहुण्यांचं आगमन, अभिनेत्रीने शेअर केले PHOTO ) दरम्यान शमिता शेट्टी 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी झाली होती. यावेळी राकेश बापट शमिताला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता. यावेळी दोघांनी खूपच रोमँटिक वेळ सोबत घालवला होता. त्यांनतर राकेश घरातून बाहेर झाला होता. नुकतंच बिग बॉसच्या फिनालेनंतर शमिता शेट्टीचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी राकेश बापटसुद्धा उपस्थित होता. दोघांनी सोबत पापाराझींना पोजसुद्धा दिल्या होत्या.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg Boss OTT, Entertainment, Tv actor

  पुढील बातम्या