News18 Lokmat

शाहरुख विरोधात करण जोहरचं ट्वीट, चाहते म्हणाले #ShameOnKaranJohar

सोशल मीडियावर केलेल्या छोट्याशा गोष्टीची खूप मोठी किंमत मोजावी लागते. सध्या अशीच चूक प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याने केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 05:12 PM IST

शाहरुख विरोधात करण जोहरचं ट्वीट, चाहते म्हणाले #ShameOnKaranJohar

मुंबई, 22 मार्च : सोशल मीडियावर कोण कसं ट्रोल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर केलेल्या छोट्याशा गोष्टीची खूप मोठी किंमत मोजावी लागते. सध्या अशीच चूक प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याने केली आहे. त्याच्या या चुकीमुळे करणला त्याच्या चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. सध्या ट्विटरवर #ShameOnKaranJohar हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

करणने सोशल मीडियावर केलेल्या चुकीमुळे त्याचे चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. खरंतर माझ्याकडून हे नकळत झालं असं करणने म्हटलं. पण तरीदेखील त्याच्या चाहत्यांचा राग काही कमी होत नाही आहे.

ते झालं असं की, ट्विटरवर एका यूजरने केसरी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसला घेऊन एक पोस्ट केलं. त्या पोस्टमध्ये त्याने लिहलं की, 'होळीच्या मुहूर्तावर "केसरी" चित्रपटाची कमाई खूप कमी झाली. पण अशाच मोहोत्सवादिनी रिलीज करण्यात आलेल्या शाहरुख खानच्या "झिरो" चित्रपटाची कमाई तर याऊनही कमी आहे.' त्यात या ट्वीटमध्ये शाहरुखला ब्रीगेड स्टार म्हणण्यात आलं आहे. तर अक्षय कुमारच्या चाहत्यांना अपील करण्यात आलं की शाहरुखच्या चाहत्यांनी भांडणामध्ये अक्षक कुमारचा अपमान करू नये.

गोष्ट या ट्वीटपर्यंत थांबत नाही. खरा गोंधळ तर तेव्हा झाला जेव्हा करण जोहरने या पोस्टला लाईक करत ते रिट्वीट केलं. करण जोहरच्या या वागण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आणि काही क्षणात करण जोहर विरोधात ट्विटरवर वादळ उठलं असं म्हणायला हरकत नाही.


Loading...

नेटकऱ्यांनी #ShameOnKaranJohar हा हॅशटॅग वापरत करण जोहरवर चौफेर टीका केली आहे. चाहत्यांच्या या नाराजीमुळे करणने हे चूकन झालं. ट्वीटमध्ये काही प्रॉब्लेम झालं असल्य़ाचं ट्वीट करत माफी मागितली. पण आता त्यावर चाहते त्याला माफ करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


VIDEO: '...तर हेमा मालिनीसुद्धा पंतप्रधान झाल्या असत्या'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2019 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...