मुंबई, 19 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला. या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार आहे. सुशांतचं कुटुंबं, त्याच्या जवळच्या व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनी याबाबत सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. मात्र दुसरीकडे आता निर्माती एकता कपूरलाही (ekta kapoor) पुन्हा ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.
बालाजी टेलिफिल्म्सची मालक आणि डेली सोप क्विन एकता कपूरला नेटिझन्सनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. सुशांतच्या नावाने तिनं पवित्र रिश्ता नावाचं फंड सुरू केलं आहे आणि यावरूनच सोशल मीडियावर तिला लक्ष्य केलं जात आहे. #ShameOnEktaKapoor हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.
सुशांत सिंह राजपूत डिप्रेशनमध्ये होता अशी माहिती समोर आली. त्यानंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबाबत चर्चा सुरू झाली. एकता कपूरने तर पवित्र रिश्ता नावाच्या फंडची सुरुवात केली. पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांतने काम केलं होतं आणि याच मालिकेच्या नावाने तिने निधी जमवणं सुरू केलं. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या फोटोचाही वापर करण्यात आला आहे. मानसिक आरोग्यासाठी हा निधी जमवला जातो आहे. त्यावरून एकता कपूरवर आता निशाणा साधला जातो.
सुशांतची बहीण श्वेताच्या पतीने सांगितलं होतं की, सुशांतच्या नावाने जर कुणी काही करत असेल तर नफा मिळवण्याच्या उद्देशाने करू नये. दरम्यान यानंतर एकता कपूरने पवित्र रिश्ता मेंटर अवेरनेस फंडमधून माघार घेतली आहे. एकताने याबाबत ट्विट केलं आहे.
Even though this is not a fund started by me, but started by Zee and is a needed one at that, I am always with Zee for any other mental awareness fund that they want to do, but on this one I would like to respectfully dissociate myself. #SSR Hope the truth prevails. pic.twitter.com/XGjiVEUZ1t
एकता म्हणाली, "हा फंड माझ्यामार्फत नाही तर झीमार्फत सुरू करण्यात आला आहे, अशा फंडची खूप गरज आहे. मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीबाबत निधीच्या मोहिमेत मी झीबरोबर नेहमीच आहे. मात्र आता या फंडमधून मी माघार घेत आहे. सत्याचा विजय होईल, अशी आशा मला आहे"
एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांतनं त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांतच्या चाहत्यांनी तिलाही लक्ष्य केलं. एकताबाबत बोलताना सुशांतसह पवित्र रिश्तामध्ये काम केलेली त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे म्हणाली होती, नेपोटिझमवरून सुरू असलेल्या वादाचा भाग असेलली एकता कपूर हिनेच सुशांतला पवित्र रिश्तामध्ये लाँच केलं होते. जेव्हा सुशांतला पवित्र रिश्ता सोडायचं होतं तेव्हादेखील ती 'ठिक आहे. तुला आता पुढे जाऊन फिल्ममध्ये काम करायचं आहे तर करू शकतोस', असं म्हणाली होती"
"काय पो छे ही सुशांतची पहिली फिल्म अभिषेक कपूर यांनी दिग्दर्शित केली होती. अभिषेक कपूर हे एकताचे भाऊ. त्यामुळे एकताने त्यांना सुशांतची या फिल्ममध्ये निवड करू नये असं सांगू शकली असती. मात्र तिनं तसं केलं नाही. यानंतर एकता सुशांतकडे अनेकदा अनेक फिल्म्स घेऊन गेली मात्र सुशांतने त्या केल्या नाहीत", असंही अंकिताने न्यूज 18 शी बोलताना सांगितलं होतं.