मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या वागणुकीमुळे शक्तिमान फेम वैष्णवी महन्त नाराज, रागाने म्हणाल्या...

पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या वागणुकीमुळे शक्तिमान फेम वैष्णवी महन्त नाराज, रागाने म्हणाल्या...

वैष्णवी महन्त   (Vaishnavi ) यांनी शक्तिमानमध्ये गीता विश्वास  ही व्यक्तिरेखा साकारली होती. शक्तिमानची प्रेयसी म्हणून प्रसिद्ध झालेल्या वैष्णवी यांना आजही गीता विश्वास या भूमिकेसाठी ओळखले जाते.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 22 डिसेंबर- वैष्णवी महन्त   (Vaishnavi) यांनी शक्तिमानमध्ये गीता विश्वास  ही व्यक्तिरेखा साकारली होती. शक्तिमानची प्रेयसी म्हणून प्रसिद्ध झालेल्या वैष्णवी यांना आजही गीता विश्वास या भूमिकेसाठी ओळखले जाते. मात्र एका पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांचा अपमान झाल्याचा एख व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या झालेल्या अपमानामुळे त्या पुरस्कार सोहळा मध्येच सोडून रागाने निघून आल्या.

हा व्हिडिओ पाहल्यानंतर लक्षात येते की, वैष्णवी महन्त या चिडल्या आहेत. यावेळी काही लोक त्यांच्या रागाचे कारण विचारतात. त्यावर वैष्णवी महन्त म्हणाल्या की, एक तर पुरस्कार सोहळ्याला बोलवता आणि तासतास बसवून ठेवता. आणि उलट नाव देखील चुकीचे घेता. साधं नाव यांच्या लक्षात येत नाही. नाव पुकारता तेव्हा देखील वंदना असेच नाव घेतले. मला वाटले चुकून झाले असेल. मात्र त्यानंतर पुरस्कार वितरण करताना देखील वंदना हेच नाव घेता. अशाने राग येईल तर काय होईल असं त्या रागाने सांगताना दिसल्या.

वाचा-Justin Bieber च्या गाण्यावर Alia Bhatt चा देसी डान्स; जबरदस्त VIDEO VIRAL

यावेळी कॉमेडियन सुनील पाल देखील उपस्थित होता. तो देखील म्हणाला, असं होण चुकीचे आहे. कारण वैष्णवी महन्त यांचे नाव मोठे आहे. इतक्या वर्षी त्यांनी काम केले आहे. शक्तिमानमध्ये गीता विश्वासची भूमिका साकारली होती. आजही लोक त्यांना त्याच नावाने ओळखतात. अशा अभिनेत्रीसोबत असं झाल्यावर राग येणारच ना.. किमान निवेदकांनी तरी याची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या शोमध्ये कोण येणार आहे याची माहिती निवेदकास असायला पाहिजे असे देखील यावेळी त्यांनी सांगितले. हा पुरस्कार सोहळा कोणता होता याबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

" isDesktop="true" id="647158" >

वैष्णवी यांनी शक्तिमान याच मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी 'मिले जब हम तुम', 'सपने सुहाने लडकपनके', 'नागिन' अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकांशिवाय वैष्णवी यांनी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 'मैदान ए जंग', 'बरसात की रात', 'दानवीर' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Tv serial, Tv shows