मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: आयुष्यात कधीही चालू शकणार नाही डॉक्टरांनी दिलं होतं उत्तर;वाचा डान्सर शक्ती मोहनचा भावुक करणारा प्रवास

HBD: आयुष्यात कधीही चालू शकणार नाही डॉक्टरांनी दिलं होतं उत्तर;वाचा डान्सर शक्ती मोहनचा भावुक करणारा प्रवास

शक्ती मोहनचा जन्म १२ ऑक्टोबर १९८५ला दिल्ली येथे झाला होता. तिला बालपणापासूनचं डान्सची प्रचंड आवड होती.

शक्ती मोहनचा जन्म १२ ऑक्टोबर १९८५ला दिल्ली येथे झाला होता. तिला बालपणापासूनचं डान्सची प्रचंड आवड होती.

शक्ती मोहनचा जन्म १२ ऑक्टोबर १९८५ला दिल्ली येथे झाला होता. तिला बालपणापासूनचं डान्सची प्रचंड आवड होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 12cऑक्टोबर- शक्ती मोहन (Shakti Mohan) हे नाव आज सर्वांच्या ओळखीचं आहे. शक्तीने आपल्या डान्सने(Dance) सर्वांचं मन जिंकलं आहे. आज तिचे लाखो चाहते आहेत. ही अभिनेत्री, डान्सर आज आपला वाढदिवस(Birthday Today) साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या काही खास गोष्टी.

View this post on Instagram

A post shared by Shakti Mohan (@mohanshakti)

शक्ती मोहनचा जन्म १२ ऑक्टोबर १९८५ला दिल्ली येथे झाला होता. तिला बालपणापासूनचं डान्सची प्रचंड आवड होती. वडील ब्रिजमोहन आणि आई कुसुम यांच्या या लाडके कन्येला समज आल्यापासूनचं असं वाटलं की ती फक्त डान्ससाठीच जन्मली आहे. मात्र अभ्यासात हुशार असल्याने तिला IAS ऑफिसर बनण्याची इच्छा झाली होती. मात्र नशिबाला तिला डान्सरचं बनवायचं होतं त्यामुळे तिची ती इच्छा अपूर्ण राहिली. जेव्हा शक्ती मोहनला वाटलं तिला एक डान्सरच बनायचं आहे, तेव्हा तिने लुईस प्रोफेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून डान्सचं अधिकृत शिक्षण घेतलं. त्यासाठी ती २००६मध्ये मुंबईत शिफ्ट झाली होती. त्यांनतर २००९मध्ये तिने 'डान्स इंडिया डान्स' या रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता, तसेच त्याची विजेतीदेखील बनली होती. त्यानंतर ती झलक दिखला जा सारख्या अनेक मोठ्या शोचा हिस्सा बनली आणि आपल्या डान्स स्टेप्सने सर्वांना वेड लावलं.

(हे वाचा: KBC 13 सेटवर वाढदिवस साजरा करत, बिग बींना आवरता आले नाही अश्रू...)

शक्ती मोहनने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, 'तिला या प्रवासात तिच्या आई-वडलांचा फार मोठा स्पोर्ट मिळाला आहे. जेव्हा तिने डान्सर बनण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा नातेवाईक तिला टोमणे देत असे. नावं ठेवत असे. मात्र या वेळेत तिच्या आई-वडिलांनी तीला मोठा आधार दिला. ती सांगते जर आईवडिलांचा सपोर्ट नसता तर ती आज या स्थानावर नसती. तसेच मीडिया रिपोर्टवर, शक्ती जेव्हा ४ वर्षांची होती, तेव्हा शक्तीसोबत एक मोठा अपघात झाला होता. एका अपघातात तिच्या पायाची आणि कमरेची हाडं खूप वाईट पद्धतीने डॅमेज झाली होती. ती अनेक महिने रुग्णलयात होती. डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांना म्हटलं होतं की ती आता कधीच चालू शकणार नाही. मात्र तिच्या वडिलांना पूर्ण विश्वास होता आपली मुलगी फक्त चालणारच नाही तर आकाशाला गवसणी घालणार. आणि तिच्या वडीलांचे हे बोल खरे ठरले.

(हे वाचा:Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्याकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती)

शक्ती मोहनने अनेक डान्स शोज केले आहेत. तसेच तिने 'दिल दोस्ती डान्स' या डान्सवर आधारित सिरीयलमध्ये काम केलं आहे. हि सिरीयल प्रचंड लोकप्रिय झाली होती. तसेच शक्तीने 'डान्स प्लस' हा डान्स शोदेखील अनेकवेळा जज केला आहे. शक्ती मोहनने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये कोरियोग्राफी केली आहे. यामध्ये तिच्यासोबत धर्मेश आणि पुनीत पाठकसुद्धा होते. तर महाजज म्हणून रेमो डिसुझा होते. त्यांनतर शक्ती पुन्हा या शोच्या नव्या सीजनमध्येही दिसून येईल.

First published:

Tags: Entertainment