शक्ती कपूरचा मुलगा बनला 'डाॅन'

शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरच्या निरागस चेहऱ्यात दिग्दर्शक अपूर्व लाखियाला कशी काय हसीना दिसली कोण जाणे! आणि शक्ती कपूरच्या मुलाला सिद्धार्थला त्यानं चक्क दाऊदची भूमिका दिली की हो!

  • Share this:
30 मार्च : शक्ती कपूरची छबी त्याच्या मुलांचा पिच्छा काही सोडत नाहीय. शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरच्या निरागस चेहऱ्यात दिग्दर्शक अपूर्व लाखियाला कशी काय हसीना दिसली कोण जाणे! आणि शक्ती कपूरच्या मुलाला सिद्धार्थला त्यानं चक्क दाऊदची भूमिका दिली की हो! दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरवर सिनेमा बनतोय 'हसीना-द क्वीन आॅफ मुंबई'. त्यात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. आणि दाऊदच्या भूमिके सिद्धार्थ कपूर. सिद्धार्थची बाॅलिवूडमधली ही एन्ट्री आहे. आपल्या भावासोबत काम करायला मिळतेय, म्हणून श्रद्धा खूश आहे. ती म्हणते, 'आम्हा कलाकारांना अशी आव्हानं स्वीकारावीच लागतात. आम्ही एकत्र काम करताना तो माझा फक्त सहकलाकार असेल, भाऊ नाही.' दिग्दर्शक अपूर्व लाखिया गुन्हेगारीपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'शूटआऊट अॅट लोखंडवाला', 'मिशन इस्तंबुल'सारखे सिनेमे त्यानं बनवलेत.
First published: