श्रद्धा कपूरचं ‘याच्याशी’ ठरलं लग्न? वडील शक्ती कपूर म्हणतात...

श्रद्धा कपूरचं ‘याच्याशी’ ठरलं लग्न? वडील शक्ती कपूर म्हणतात...

मागच्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर आता वडील शक्ती कपूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा साहोच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात ती साउथ सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. दरम्यान काही दिवसांपासून श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चा  सगळीकडे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद मिररनं श्रद्धा कपूर 2020मध्ये बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठासोबत लग्न करणार असणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर श्रद्धा कपूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार अशी चर्चा सुरू झाली होती. एवढंच नाही तर श्रद्धाची आई शिवांगी कपूर सुद्धा लग्नाच्या तयारीला लागल्याचं बोललं जात होतं. यावर आता श्रद्धाचे वडील अभिनेता शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतंच एका मुलाखतीत शक्ती कपूर यांना श्रद्धाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर शक्ती यांनी हटके अंदाजात दिलं. ते म्हणाले, ‘ खरंच माझी मुलगी लग्न करतेय, प्लिज मला नक्की बोलवा. लग्न कधी आहे हे सुद्धा तुम्ही सांगा मी त्या ठिकाणी पोहचेन. मी तिचा बाबा आहे पण तरीही मला तिच्या लग्नाबद्दल काहीच माहिती नाही.’ अशी गमतीशीर प्रतिक्रिया शक्ती कपूर यांनी दिली. एकंदर त्यांनी श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे श्रद्धाच्या चाहत्यांची काही प्रमाणात निराशा झाली आहे.

या 10 सेलिब्रिटींनी शेअर केले हॉट फोटो, एक तर बॉलिवूडची स्टार

 

View this post on Instagram

 

Celebrating 👨‍👩‍👧‍👦🏝🌊❤️ @siddhanthkapoor

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

श्रद्धा मागच्या 2 वर्षांपासून रोहन श्रेष्ठासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. रोहन हा फोटोग्राफर असून प्रसिद्ध फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आहे. यशिवाय तो नेपाळचा प्रसिद्ध फुटबॉलपटू सुद्धा आहे. मागच्या दोन वर्षांपासून नात्यात असलेल्या श्रद्धा आणि रोहन यांचे एकत्र अनेक फोटो आता पर्यंत समोर आले आहेत. अशात आता हे दोघंही त्यांचं नातं ऑफिशियल करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार या दोघांच्या कुटुंबीयांमध्ये बोलणी चालली असल्याचं बोललं जातं. रोहन सुद्धा श्रद्धाच्या अनेक फॅमिली फंक्शनमध्ये दिसतो.

आणि काय हवं : बोल्ड अवतारानंतर प्रिया बापट नवऱ्याबरोबरच दिसणार वेबसीरिजमध्ये

श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा बहुचर्चित ‘साहो’ येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय वरुण धवनसोबत ती ‘स्ट्रीट डान्सर 3D’मध्ये दिसणार आहे. त्यानंतर ती लगेचच बागी मध्ये दिसणार आहे. त्यानंतर ती लगेचच ‘बागी 3’ ‘छिछोरी’ या सिनेमांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यावरून सध्या तिचं शेड्युल खुप बीझी आहे हे दिसत आहे. त्यामुळे श्रद्धा आता तिच्या कामावर फोकस करत असून सध्या तरी तिचा लग्नाचा कोणताही विचार नाही असं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धाला लग्नाविषयी विचारण्यात आलं होतं त्यावर सध्या पुढची  5-6 वर्ष तरी मला लग्न करायचं नाही असं तिनं सांगितलं होतं.

अमृता फडणवीसांच्या ट्वीटनंतर मुंबई पोलिसांनी पायल रोहतगीचं Twitter केलं अनब्लॉक

===================================================

VIDEO: विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 09:34 AM IST

ताज्या बातम्या