S M L

शेक्सपीअरचं 'हॅम्लेट' मराठी रंगभूमीवर

महेश एलकुंचवारांच्या वाडा नाट्यत्रयीच्या यशस्वी प्रयोगांनंतर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतलाय. काल पार पडलेल्या झी नाट्य गौरव पुरस्कारात या नाटकाची घोषणा करण्यात आलीय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 29, 2018 08:21 PM IST

शेक्सपीअरचं 'हॅम्लेट' मराठी रंगभूमीवर

29 मार्च : शेक्सपीअरचं गाजलेलं नाटक 'हॅम्लेट' आता मराठी रंगभूमीवर दाखल होणारे. महेश एलकुंचवारांच्या वाडा नाट्यत्रयीच्या यशस्वी प्रयोगांनंतर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतलाय. काल पार पडलेल्या झी नाट्य गौरव पुरस्कारात या नाटकाची घोषणा करण्यात आलीय.

या नाटकात अभिनेता सुमीत राघवन हा 'हॅम्लेट'ची मध्यवर्ती भूमिका साकारणार असून त्याच्याशिवाय समीर धर्माधिकारी, मुग्धा गोडबोले, मनवा नाईक असे तब्बल 18 कलावंत या नाटकात काम करताना आपल्याला दिसतील.

या नाटकाची निर्मिती झी मराठी करणार असून या नाटकाद्वारे सिनेमांप्रमाणेच नाट्यनिर्मितीतही झी पदार्पण करतेय. हे नाटक भव्य दिव्य रूपात मराठी रंगभूमीवर सादर करण्याचा निश्चय या सगळ्यांनी मिळून केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2018 08:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close