Home /News /entertainment /

शाहरुखच्या 'मन्नत'वर आहे सासूबाईंचा कंट्रोल; असं सांभाळते संपूर्ण घर

शाहरुखच्या 'मन्नत'वर आहे सासूबाईंचा कंट्रोल; असं सांभाळते संपूर्ण घर

घरातील प्रत्येक लहानमोठ्या कामकाजावर शाहरुखच्या सासूबाईंचं म्हणजेच गौरीच्या आईचं लक्ष असतं.

  मुंबई 4 जुलै : अभिनेता शाहरुख खान (Sharukh Khan) भलेही बॉलिवूडचा बादशाह असेन पण घरी मात्र सासूबाईंचा हुकूम चालतो. शाहरुखची पत्नी गौरीच (Gauri Khan) ही काही चालत नाही. शाहरुख आणि गौरीच्या कामाचं सगळं नियोजन गौरीची आई सविता चिब्बर (Savita Chibber) या करतात. विशेष म्हणजे मुंबईत नाही तर दिल्लीत बसून त्या हा सगळं कारभार सांभाळतात. स्वतः गौरीनेच याविषयी एका मुलाखतीत सांगितल होतं.

  'द फॅमिली मॅन 2'च्या राझीचा बॅकलेस बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते घायाळ

  गौरी आणि शाहरुख दोघेही आपापल्या कामानिमित्त फारच व्यस्त असतात. अशात त्यांना घराकडे जास्त वेळ देता येत नाही. तर घरातील सर्व नोकर मंडळींवर एकूणच सगळ्या स्टाफवर सविताच वचक ठेवतात. व्हॉट्सअप वर फोन वर त्या सतत स्टाफ च्या संपर्कात असतात. घरातील प्रत्येक काम व्यवस्थित व्हायला हवं याकडे त्या लक्ष देतात.
  View this post on Instagram

  A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

  शाहरुख चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असतो. तर गौरी ही एक इंटेरियर डिझायनर आहे. तीच स्वतःच ऑफिस देखील आहे. त्यामुळे ती देखील तिच्या कामात व्यस्त असते. त्यामुळे संपूर्ण मन्नत बंगल्याची (Mannat Bunglow) सूत्र ही सविता यांच्याच हातात आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

  गौरीने हे देखील सांगीतल होतं की, “आईमुळे मला फार मदत होते. आणि त्यामुळे घरचा स्ट्रेस कमी होतो. मी असं का म्हणत आहे हे वर्किंग वाइफ समजू शकतात.” असही ती म्हणाली. पुढे ती म्हणाली, “वर्किंग वाइफ वर फक्त घरचा नाही तर कामाचाही ताण असतो. दोन्ही गोष्टी सांभाळताना खूप कसरत करावी लागते. अशा वेळी घरात आई ची किंवा सासूची मदत मिळाली तर याहून चांगलं ते काय?”
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Shahrukh khan

  पुढील बातम्या