ट्विटरवर शाहरुखचे फॉलोअर्स झाले 3 कोटी 3 लाख, शेअर केला अनोखा व्हिडिओ

ट्विटरवर शाहरुखचे फॉलोअर्स झाले 3 कोटी 3 लाख, शेअर केला अनोखा व्हिडिओ

किंग खान शाहरुखच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झालीये. बॉलिवूडच्या या बादशाहचे ट्विटरवर चक्क 3.3 कोटी इतके फॉलोअर्स झालेत.

  • Share this:

13 फेब्रुवारी : किंग खान शाहरुखच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झालीये. बॉलिवूडच्या या बादशाहचे ट्विटरवर चक्क 3.3 कोटी इतके फॉलोअर्स झालेत. ट्विटरवर फॉलोअर्स वाढल्याने शाहरुखने एका अनोख्या पद्धतीने चाहत्यांचे आभार मानलेत. शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय.

शाहरुखने चाहत्यांचे आभार मानण्यासाठी चक्क स्वीमिंग पूलमध्ये उडी मारलीये. या व्हिडिओमध्ये शाहरुख महागडा सुट आणि काळ्या रंगाच्या गॉगलमध्ये दिसतोय. शाहरुखने हा व्हिडिओ शेअर करताना मी कधीच नियोजन करुन काम करत नाही पण आज मात्र मी ठरवून तुमच्यासाठी एक गोष्ट करत असल्याचं म्हटलंय. शाहरुख फॉलोर्वसची वाढती संख्या पाहून फारच खूश दिसतोय.

First published: February 13, 2018, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading