Home /News /entertainment /

गौरी खाननं अनन्या पांडेला दिलं खास GIFT! अभिनेत्रीनं फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

गौरी खाननं अनन्या पांडेला दिलं खास GIFT! अभिनेत्रीनं फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

अभिनेत्री अनन्या पांडेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे.

    मुंबई, 12 जानेवारी-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री अनन्या पांडेनं   (Ananya Panday)  फारच कमी वेळेत आपली खास ओळख निर्माण केली आहे. चंकी पांडेची मुलगी असणाऱ्या अनन्याने आपली स्वतः ची एक खास ओळख निर्माण केली आहे. अनन्या पांडे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. ती सतत आपले फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकताच अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो फारच खास आहे, कारण यामध्ये अनन्या आपल्याला गौरी खानकडून  (Gauri Khan)   मिळालेल्या गिफ्टबद्दल सर्वांना सांगत आहे. अभिनेत्री अनन्या पांडेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती एका सुंदर पोर्ट्रेटसह उभी आहे.हा पोर्टेट अनन्यासाठी फारच खास आहे. कारण तो तिचाच पोर्ट्रेट आहे. अभिनेत्री या फोटोमध्ये पोर्ट्रेटच्या समोर उभी राहून अगदी तशीच पोज देताना दिसून येत आहे. इन्स्टावर ही पोस्ट शेअर करत अनन्याने सांगितलं आहे, की हा पोर्टेट तिला शाहरुख खानची पत्नी गौरी खानकडून गिफ्ट मिळाला आहे.अभिनेत्री या पोस्टद्वारे गौरी खानचं आभार व्यक्त करत आहे. अनन्या पांडेचं शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाशी फारच खास बॉन्डिंग आहे. अनन्या पांडे शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची बालमैत्रीण आहे. त्या दोघी एकमेकांच्या फारच घट्ट मैत्रिणी आहेत. सतत सोशल मीडियावर त्यांचे थ्रोबॅक फोटो पाहायला मिळत असतात. हा पोर्ट्रेट यासाठी खास आहे, कारण अनेक आधुनिक गोष्टींच वापर करून तो बनवण्यात आला आहे. हा मल्टीकलर पोर्ट्रेट पाहायला फारच क्लासी वाटत आहे. अनन्याने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये हा फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'आय लव्ह इट, स्टनिंग,वाह्ह्ह'. म्हणत अनन्याने आपला आनंद व्यक्त केला आहे. अनन्या पांडे सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर २०.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती सतत आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याबद्दल काही नं काही पोस्ट करत असते. अलीकडे अनन्या पांडे फारच बोल्ड अँड ब्युटीफुल फोटोशूट करत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फारच कमी वेळेत अनन्याने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याच्या चाहत्यांना तिची प्रत्येक पोस्ट पसंत पडते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. तिच्या सौंदर्याने आणि क्युटनेसने ती सर्वांनाच घायाळ करत असते. (हे वाचा:समंथाचं चाहत्यांना फिटनेस चॅलेंज; VIDEO पाहून भल्याभल्यांना फुटला घाम) अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती लवकरच दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'गहराइंया' या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचे सहा पोस्टर रिलीज झाले आहेत. तेव्हापासून सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. तर अनन्या पांडे साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लायगर' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटातुन विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अनन्या आणि विजय देवरकोंडाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. चाहते यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Ananya panday, Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या