01 डिसेंबर : बाॅलिवूड बादशहा शाहरूख खान आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. स्टार प्लसचा नवा शो सुरू होतोय 'टेड टाॅक्स इंडिया: नई सोच'.
या शोमध्ये वक्ता 18 मिनिटं दिलेल्या विषयावर बोलेल. शोचा होस्ट अर्थातच किंग खान. शाहरूख शो रंजक बनण्यासाठी एकता कपूर आणि करण जोहरलाही आणणार आहे. दोघं आपापल्या काँट्रोव्हर्शियल आयुष्याबद्दल बोलतील. दोघं वेगवेगळ्या एपिसोडमध्ये येणार आहेत.
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती या शोमध्ये येतील. किंग खान त्याला आपल्या आयुष्याबद्दल बोलायला प्रोत्साहित करेल. रजनीकांतलाही विचारलं गेलंय. पण अजून तो नक्की झाला नाही. त्याला 'आनंदी राहणं का जरुरी आहे' असा विषय दिला जाणार आहे.
शो 10 डिसेंबरपासून सुरू होतोय. दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता. सध्या शाहरूखचा प्रोमो व्हायरल झालाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा