• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • शाहरुखच्या 'LION'मध्ये नयनताराची जागा घेणार समंथा? जाणून घ्या सत्य

शाहरुखच्या 'LION'मध्ये नयनताराची जागा घेणार समंथा? जाणून घ्या सत्य

बॉलिवुडचा किंग खान, शाहरुख प्रसिद्ध तमीळ दिग्ददर्शक अॅटलीच्या (Director Atlee) एका आगामी चित्रपटामध्ये काम करणार आहे.

 • Share this:
  मुंबई,26ऑक्टोबर- बॉलिवुडचा (Bollywood) अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) सध्या मुलाच्या ड्रग्ज केसमुळं संकटात सापडला आहे. त्याचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात असून त्याला बाहेर काढण्यासाठी शाहरुखचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यानं आपलं कामदेखील थांबवलेलं आहे. त्याच्या मुलाच्या प्रकरणाचा परिणाम शाहरुखच्या कामावरदेखील होत असल्याचं समोर आलं आहे. पण त्याची प्रोजेक्ट सुरू आहेत त्यात काही बदल होत असल्याचं दिसतंय. बॉलिवुडचा किंग खान, शाहरुख प्रसिद्ध तमीळ दिग्ददर्शक अॅटलीच्या (Director Atlee) एका आगामी चित्रपटामध्ये काम करणार आहे. अॅटलीचा हा चित्रपट एक पॅन इंडिया प्रोजेक्ट असून त्यामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत नयनतारा, प्रियामणी, योगी बाबू, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर अशी तगडी स्टार कास्ट आहे. मात्र, या स्टारकास्टमध्ये आता बदल होण्याची शक्यता आहे. या बिग बजेट चित्रपटामध्ये दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार नयनताराच्या (Nayanthara) जागी संमथा रुथ प्रभूची (Samantha Ruth Prabhu) वर्णी लागल्याच्या चर्चा सुरू आहेत. बॉलिवुड लाईफ डॉट कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तूर्तास 'लायन' (lion) असं नामकरण केलेल्या या अॅक्शन थ्रिलरचं या वर्षी (2021) सप्टेंबरमध्ये पुण्यात चित्रीकरण सुरू करण्यात आलं आहे. चित्रकरणासाठी अभिनेत्री नयनतारानं आपल्या ऑक्टोबरमधील तारखा दिल्या होत्या. मात्र, सध्या शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज केसमध्ये व्यस्त असल्यानं तो चित्रिकरणासाठी येऊ शकत नाही. परिणामी चित्रपटाचं शूटिंग सध्या थांबवण्यात आलं आहे. तर, ऑक्टोबरमधील तारखा पुन्हा अॅडजस्ट करणं नयनताराला शक्य नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं तिनं या चित्रपटातून माघार घेतल्याची चर्चा आहे. तिची जागा घेण्यासाठी दिग्दर्शक अॅटलीनं समंथा रुथ प्रभूला विचारणा केली असल्याची माहिती समोर आली आहे. (हे वाचा:Aashram: प्रकाश झा नंतर 'बजरंग दल'Boby Deol च्या शोधात; PGI ने व्यक्त केली खंत) आपल्या घटस्फोटामुळं गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री समंथानं नुकतंच गुणशेखर दिग्दर्शित 'शाकुंतलम्' या चित्रपटाच शूटिंग पूर्ण केलं आहे. यामध्ये ती देव मोहन आणि अल्लू अर्हा यांच्या सोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे. तर, किंग खान 'पठाण' नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. स्पाय थ्रीलर असलेल्या पठाणमध्ये दीपिका पदुकोण रॉ एजंटच्या आणि जॉन अब्राहम व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अभिनेता सलमान खान (रॉ एजंट टायगर) देखील या चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहे.दिग्दर्शक अॅटलीचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या लायन चित्रपटाला ए आर रहमान (AR Rahman) संगीत देणार असल्याची चर्चा आहे. रहमान यांनी यापूर्वी शाहरुखच्या 'दिल से' आणि 'जब तक है जान' या हिट चित्रपटांना संगीत दिलेले आहे. लायन चित्रपटामध्ये शाहरुखचं पात्र, अन्याय झालेल्या आणि बदला घेण्यास उत्सुक असलेल्या महिलांची एक टीम तयार करतो. त्यांच्या मदतीनं तो अतिशय मौल्यवान वस्तू लुटताना दिसणार आहे, अशी अशी चर्चा आहे.
  First published: