Home /News /entertainment /

सुहाना खानचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं व्हेरिफाइड, बॉलिवुड पदार्पणाआधीच आहेत लाखो फॉलोअर्स

सुहाना खानचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं व्हेरिफाइड, बॉलिवुड पदार्पणाआधीच आहेत लाखो फॉलोअर्स

शाहरुख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं आता जवळजवळ निश्चित झालं आहे. तिने झीरो सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामही केलं. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शाहरुख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं आता जवळजवळ निश्चित झालं आहे. तिने झीरो सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामही केलं. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याआधीच सुहाना खानची मोठी फॅन फॉलोइंग आहे. नुकतच तिने तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं आहे. त्यामुळे तिच्या फॅन्सच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे.

  मुंबई, 09 मार्च : किंगखान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याआधीच तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या कॉलेजमधील फोटो सोशल मीडियावर येतात. गेल्यावर्षी तीने रोममधील तिचा फोटो शेअर केला होता. तो फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याआधीच तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. दरम्यान तिने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं आहे. काही महिन्यांपासून प्रायव्हेट असणारं अकाउंट सुहानाने पब्लिक केल्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाली आहे. ती सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नसली तरीही तिचे फॉलोअर्स खूप आहेत. तिचे फॅनपेजही अनेक होते. त्यामुळे नेमकं सुहानाचं ऑफिशिअल अकाउंट कोणतं, असा प्रश्न पडायचा.  पण आता तिचं अकाउंट पब्लिक आणि व्हेरिफाइडही झालं आहे. (हे वाचा-'बधाई हो'च्या सिक्वेलमध्ये आयुष्मानच्या जागी 'राजकुमार राव', अभिनेत्रीही बदलली) सुहाना खानने तिचं अकाउंट पब्लिक केल्यानंतर ते व्हेरिफाइड देखील झालं आहे. सुहानाचे जवळपास 1 लाख 40 हजार फॉलोअर्स आहेत. या अकाउंटवर तिने फॅमिलीबरोबर अनेक फोटो शेअर केले आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

  तसंच तिच्या मित्रमैत्रिणींबरोबरही फोटोज आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये शाहरुखबरोबर तिने एकही फोटो अपलोड केलेला नाही. (हे वाचा-स्विमिंग सूटमधील दीपिकाचे फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘सर्वात HOT फोटोशूट...’) सुहानाचे फॉलोअर्स जरी दिवसेंदिवस वाढत असले तरीही ती सोशल मीडियावर फारशी अक्टिव्ह नाही आहे. तिने 11 आठवड्यांपूर्वी शेवटचा फोटो पोस्ट केला होता. दरम्यान सुहाना लवकरच बॉलिवुडमध्ये पदार्पण करेल अशी चर्चा आहे. एसआरकेचे आणि तिचे फॅन्स तिच्या बॉलिवुड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे धडे गिरवत आहेत. काही दिवसांपूर्वी सुहाना तिच्या मित्राची शॉर्ट फिल्म ‘द ग्रे शेड ऑफ ब्लू’ मध्ये दिसली होती.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Shahrukh khan daughter, Suhana khan, Suhana khan photos

  पुढील बातम्या