• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • शाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर रीलिज; कमल हासनच्या अप्पूराजाची येतेय का आठवण?

शाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर रीलिज; कमल हासनच्या अप्पूराजाची येतेय का आठवण?

सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला शाहरूख खानचा झिरो चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. काय आहे या ट्रेलरचं आणि चित्रपटाचं वेगळेपण?

 • Share this:
  मुंबई, 02 नोव्हेंबर : बॉलिवूडच्या बादशाह शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘झिरो’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर  आला. चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर, गौरी खानने चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद राय यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यातील विशेष बाब म्हणजेच चित्रपटाचं संगीत मराठी संगीतकार अजय-अतुल यांनी केलं आहे. झिरो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खानने लहान उंचीच्या माणसाची व्यक्तीरेखा साकारली आहे. प्रत्येकवेळी आपल्या अभिनयातून प्रक्षकांच्या मनात छाप पाडणारा कलाकार शाहरूख खान यावेळीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिना कैफ सेलिब्रिटी हिरोईनची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर सिनेमात भाईजान सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोन, जुही चावला, करीश्मा कपूर,  आर माधवन आणि आलिया भट्ट हे पाहुणे कलाकार असणार आहेत. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार श्रीदेवी सुद्धा आपल्या दिसणार आहे. एवढे दिग्गज कलाकार असलेला हा सिनेमा येत्या 21 डिसेंबरला  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उंचीने लहान असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित झिरो चित्रपट आहे. 1989 रोजी कमल हसनने ’अप्पू राजा’ सिनेमातून अशा बुटक्या माणसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 31 वर्षांनी असा वेगळा प्रयोग ‘झिरो’ चित्रपटातून तयार करण्यात आला आहे.  

  VIDEO: पत्नीचा रोमँटिक डान्स व्हायरल, पतीनेच केला होता शूट

   
  First published: