#Zero : पोस्टरची इतकी चर्चा का?

#Zero : पोस्टरची इतकी चर्चा का?

शाहरूख खानच्या बर्थडेची चर्चा आज सर्वत्र होत असाताना, त्याच्या सिनेमाचे पोस्टर कमालिचे ट्रेण्ड करत आहेत

  • Share this:

80 90 च्या दशकात चित्रपटाच्या पोस्टरवरून सिनेमाबद्दलची गणितं मांडली जायची. आता तोच काळ पुन्हा नव्याने आला आहे, असं म्हणायला हरकत नाही. शाहरूख खानच्या 'झिरो' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

चित्रपटाचा पहिला टीझर पाहिला तर ‘मुर्ती लहान आणि किर्ती महान’ हीच म्हण आठवते. आता बादशाह शाहरुख शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ यांनी 'पा' चित्रपटात वेगळा लूक केला होता. आता शाहरुखही 'झिरो' चित्रपटातून वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बवुआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.

शाहरुखने या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं ते अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत. चित्रपटात अनुष्काने शास्त्रज्ञाची भूमिका बजावली आहे. ‘नातं बरोबरीचं’ असं कॅप्शन देत सोशल मीडियावर पोस्टर शेअर करण्यात आलं. पोस्टर आणि त्याचं कॅप्शन पाहता चित्रपटात शाहरूख आणि अनुष्काची मैत्री किंवा मैत्रीपलीकडील प्रेम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटात दोघांनीही कमी उंचीच्या माणसांची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यामुळे चित्रपटात दोघांची उंची जरी सारखी दिसत असली तरी अभिनयात कोण उंची गाठेल, हे प्रत्यक्ष चित्रपट पाहूनच कळेल.

दुसऱ्या पोस्टरमध्ये कतरिना आणि शाहरूख एकत्र दिसले आहेत. 2012 मध्ये ‘जब तक है जान’ सिनेमानंतर शाहरूख पहिल्यांदा कतरिनासोबत या चित्रपटात दिसणार आहे. याच पोस्टरने सोशल मीडियावर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. तसेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. कतरिनाचा लूक बघताच कळतं की, चित्रपटात तिने एका सेलिब्रिटीची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘नजर उठा कर देखो, शायद कोई सितारा जमीन पे आ गिरे’ असं हृदयाला भिडणारं कॅप्शन त्यांनी हे पोस्टर रिलीज करताना दिलं. पोस्टरला वापरलेलं प्रत्येक वाक्य हे ट्रेलर आणि चित्रपटाची ओढ आणखी वाढवतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2018 03:52 PM IST

ताज्या बातम्या