शाहरुखने दिलेल्या उत्तरांनी चाहत्यांची जिंकली मनं, जाणून घ्या असे 8 प्रसंग

शाहरुख खान आपल्या उत्तरांनी चाहत्यांची मनं जिंकतो. अनेकदा शाहरुख खान #AskSRK नावाचं सेशन ट्विटरवर घेत असतो.

शाहरुख खान आपल्या उत्तरांनी चाहत्यांची मनं जिंकतो. अनेकदा शाहरुख खान #AskSRK नावाचं सेशन ट्विटरवर घेत असतो.

  • Share this:
    मुंबई, 02 नोव्हेंबर : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा आज 55 वा वाढदिवस. चित्रपटांमधील त्याच्या कामाबरोबरच सार्वजनिक जीवनात देखील त्याची लोकप्रियता मोठी आहे. त्यामुळेच इतक्या वर्षांनांतरदेखील शाहरुख खान याला पसंत केलं जातं. सामान्य कुटुंबातून येऊन त्याने मुंबईमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याचबरोबर या मनोरंजन विश्वातील सर्वांत हुशार समजल्या जाणारा अभिनेता अशीही त्याची ख्याती आहे. शाहरुखचे डायलॉगदेखील त्याच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. पुरस्कार सोहळ्यांचं निवेदन असो, मुलाखत असो किंवा ट्विटरवरील संवाद असो. प्रत्येक ठिकाणी तो आपल्या चाहत्यांची मनं जिंकत असतो. ट्विटरवर सर्वांत जास्त ट्रोलिंग केलं जातं. पण या ठिकाणीदेखील शाहरुख खान आपल्या उत्तरांनी चाहत्यांची मनं जिंकतो. अनेकदा शाहरुख खान #AskSRK नावाचं सेशन ट्विटरवर घेत असतो. यामध्ये तो आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. यामधील अनेक चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक आणि जबरदस्त उत्तरं देण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे तो चर्चेत असतो. आज आपण यापैकी शाहरुखने दिलेली काही उत्तरं पाहणार आहोत. 1) आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक असलेला शाहरुख खान त्याच्या संघाला समर्थन देण्यासाठी दुबईला गेला होता. यावेळी एक सामन्यात कोलकात्याच्या राहुल त्रिपाठीने शानदार फलंदाजी करत मॅन ऑफ द मॅचचा अवार्ड मिळवला. यावेळी शाहरुख याने मागून ‘राहुल.... नाम तो सुना होगा’ असं म्हणत त्याचं कौतुक केलं होतं. शाहरुखच्या दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे चित्रपटात ‘राज, नाम तो सुना होगा’ हा डायलॉग होता. त्याचा वापर शाहरूखने कल्पकपणे केला. त्याच्या या कृतीने राहुल त्रिपाठीला देखील हसू आवरले नाही. 2) ट्विटरवर एका व्यक्तीने शाहरुख खान याला त्याचा मुंबईतील सी फेसिंग मन्नत बंगला विकणार आहेस का?, असं विचारलं होतं. त्यावर त्यानी दिलेलं उत्तर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ते होतं, ‘मन्नत बिकती नही. सर झुकाकर माँगी जाती है. याद रखोगे तो लाइफ मे कुछ पा सकोगे.’ 3) त्याचबरोबर आणखी एका चाहत्याने त्याला शाहरुख तू तुझ्या रा-वन सिनेमाची सीडी जाळून का टाकत नाहीस असं विचारलं? होतं, त्यावर याने त्याला थंडपणे उत्तर देत जखमेवर अजून किती मीठ चोळशील असं म्हटलं होतं. हे प्रश्नोत्तरांचं सेशन त्याचे चाहते आवर्जून वाचतात. 4) नुकत्याच एका मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटच्या युजरने त्याला विचारलं, तुझ्यासारखं सुपरस्टार बनण्यासाठी काय खायला हवं? यावर त्याने दिलेले उत्तर देखील खूप मजेदार होतं. ‘हा मी थोड्या दिवसांपूर्वी वाचलेला विनोद आहे. असं म्हटलं जातं की माणूस जे खातो तसा तो बनतो. तू काय खातोस असं लोक विचारतात पण अद्याप तरी मी लिजंड खाल्लेला नाही. ’ 5) अनेकदा त्याला सलमान आणि अमीर खान यांच्या पैकी एकाची निवड करण्यास सांगतात. त्यावर देखील तो आपल्या शानदार हुशारीने चाहत्यांना ‘Don’t Ask dodgy questions’ असं उत्तर देत निरुत्तर केलं. 6) शाहरुख खान याच्या महिला चाहत्यांची संख्या देखील कमी नाही. त्याचबरोबर त्याची हात पसरवरून नृत्य करण्याची स्टेप सर्वात लोकप्रिय आहे. एकदा एका मुलीनी त्याला विचारलं तू माझ्याशी लग्न करशील का? त्यावर शाहरुख खान याच्या ‘ लग्न, लग्न, लग्न... सध्या कुणी ‘मैत्री’ करण्यास उत्सुकच नसतं.’ उत्तराने त्याने अनेक जणांची मने जिंकली होती. 7) एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला की तो त्याच्या लोकप्रिय नसलेल्या मित्रांबरोबर गेल्यानंतर बिल कसं देतो. यावर तो म्हणतो की, लोकप्रिय असो वा नसो पण सोबतचे पैसे देतात मी जवळ पैसेच बाळगत नाही. 8) एका चाहत्याने लॉकडाऊनमध्ये त्याने घरी सर्वांना शाहरुखचा चाहता बनवलं, असं सांगितलं. यावर त्याने या चाहत्याला सांगितल, ‘आता सगळ्या मोहल्ल्याला माझा फॅन बनव प्लीज.’ आपल्या चाणाक्ष बुद्धीने शाहरुख नेहमीच लोकांना आकर्षित करत असतो. किंग खान म्हणजेच शाहरुख खान याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !
    First published: