...आणि सिनेमाच्या सेटवरुन शाहरुख सरळ पोहोचला तुरुंगात!

शाहरुखनं असं नक्की केलं तरी काय की त्याला शूटिंग सुरू असतानाच पोलिसांनी अटक केली.

News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2019 01:26 PM IST

...आणि सिनेमाच्या सेटवरुन शाहरुख सरळ पोहोचला तुरुंगात!

मुंबई, 27 ऑक्टोबर : बॉलिवूडचा किंग म्हणजे शाहरुख खान त्याच्या अभिनयासोबतच मीडियासोबत चांगला व्यवहार करण्यासाठी ओळखला जातो. पण काही वर्षांपूर्वी असं झालं होतं की एका संपादकांवर शाहरुख खूप रागवला होता आणि यामुळे त्याला खूप तुरुंगातही जावं लागलं होतं. नुकतंच नेटफ्लिक्सवर प्रसारित केल्या जाणाऱ्या अमेरिकन होस्ट डेव्हिड लेटरमॅन यांच्या चॅट शोमध्ये शाहरुखनं याचा खुलासा केला. याशिवाय यावेळी त्यानं त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील कठीण दिवसांबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

शाहरुखचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. आपल्या अभिनयानं शाहरुखनं असंख्य लोकांची मनं जिंकली आहेत. पण सर्वांच्या लाडक्या शाहरुखनं एक असा कारनामा केला होता की, त्यामुळे त्याला जेलची हवा खावी लागली होती. शाहरुखनं डेव्हिड लेटरमॅन यांच्याशी बोलताना सांगितलं, करिअरच्या सुरुवातीला एका मासिकात त्याच्याबद्दल एक आर्टिकल छापण्यात आलं होतं. त्यामध्ये असं काही लिहिलं गेलं होतं जे सहन करण्यापलिकडे होतं.

किंग खानच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या 'या' अभिनेत्री सध्या आहेत कुठे?

या आर्टिकलबद्दल शाहरुखला समजल्यावर त्यानं त्या मासिकाच्या संपादकांना याविषयी विचारायला गेला. यावर त्या संपादकांनी म्हटलं की, तुम्ही हे एवढं मनावर घेऊ नका ही फक्त मस्करी होती. पण शाहरुखला संपादकांची ही गोष्ट अजिबात आवडली नाही. तो रागाच्या भरात उद्धटपणे त्यांना वाटेल ते बोलला आणि तिथून निघून गेला.

Loading...

VIDEO : करिश्मा कपूरच्या गाण्यावर टायगरचा धम्माल डान्स, वाचा काय म्हणाली दिशा

शाहरुख पुढे म्हणाला, त्यानंतर एक दिवस मी एका सिनेमाचं शूट करत होतो. काही पोलिस ऑफिसर्स त्या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हटलं की त्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यानंतर मी सरळ जेलमध्ये होतो. ती जागा खूपच वाईट होती आणि लहान सुद्धा. तसेच तिथे बरेच वाईट लोक होते.

किती गोड! अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या लहानगीचा क्यूट VIDEO एकदा पाहाच

शाहरुखनं सांगितलं, सुरवातीच्या दिवसात स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहिल्यावर मला अजिबात आवडत नसे. पण मला आनंद वाटतो की लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं. मला पसंत केलं.

=========================================================

VIDEO : मंदीत 'संधी'? ठाण्यात चक्क सोन्याची मिठाई, किंमत...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 01:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...