तुमच्या धडाडीनं आम्हाला मजबूत बनवलं, शाहरुखनं मानले अभिनंदन यांचे ऋण

बाॅलिवूडचा किंग शाहरुख खाननंही ट्विट करून अभिनंदन यांचं स्वागत केलंय.

News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2019 04:53 PM IST

तुमच्या धडाडीनं आम्हाला मजबूत बनवलं, शाहरुखनं मानले अभिनंदन यांचे ऋण

मुंबई, 01 मार्च : आत कुठल्याही क्षणी विंग कमांडर अभिनंदन भारतात परततील. भारतात त्यांच्या स्वागताचा जल्लोष सुरू झालाय. बाॅलिवूडचा किंग शाहरुख खाननंही ट्विट करून अभिनंदन यांचं स्वागत केलंय.

शाहरुख खाननं लिहिलंय, घरी परत येण्यासारखी दुसरी सुखद भावना नाही. कारण घरात प्रेम, आशा आणि स्वप्नं असतात. तुमच्या धडाडीनं आम्हाला मजबूत बनवलं. आम्ही तुमचे कायम ऋणी राहू.इतर बाॅलिवूड कलाकारांनीही अभिनंदन यांचं स्वागत केलंय. सोशल मीडियावर #WelcomBackAbhinandan हा ट्रेंड होता. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी या बातमीला Great News म्हटलंय. त्यांनी अभिनंदनला वेलकम केलंय.

Loading...

अभिनेत्री तापसी पन्नूनंही आता कुठे माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटलंय, वाट पाहतोय, असं लिहिलंय.

विशाल दादलानीनं अभिनंदनला वेलकम बॅक म्हटलंय. आणि युद्ध नको असंही लिहिलंय.इम्रान हाश्मीच्या सिनेमाची अभिनेत्री सोनलनं लिहिलंय, या बातमीनं माझ्या दिवसाचं सार्थक झालं.

लेखक आणि दिग्दर्शक मिलाप जावेरीचं म्हणणं आहे, फक्त अभिनंदनचं स्वागत करत नाही, तर सोबत शांती आणि सदाचाराचंही स्वागत करतोय.

अभिनेता राहुल देवनं म्हटलंय, या बातमीनं मला मोठा आनंद झालाय.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना भारतात परत पाठवणार असल्याची घोषणा खुद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानांना करावी लागली.आज ( 1 मार्च ) वाघा बाॅर्डरवर अभिनंदन यांचं आगमन होतंय. त्यानिमित्तानं बाॅलिवूड कलाकारांनीही आपला आनंद व्यक्त केलाय.


हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी 'या' अभिनेत्रीच्या वडिलांची केली होती हत्याबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...