मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं मन्नत खूपच अलिशान आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का त्याची व्हॅनिटी व्हॅन सुद्धा एखाद्या मोठ्या अलिशान बंगल्यापेक्षा कमी नाही. ऐसपैस मोठी जागा, लॉन इत्यादी गोष्टींनी सुसज्ज असलेल्या शाहरुखच्या या व्हॅनिटी व्हॅनचे चाहते अनेक बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सुद्धा आहेत. नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्करनं शाहरुखच्या या व्हॅनिटी व्हॅनबाबतच्या काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. जे ऐकल्यावर तुम्ही ही अवाक व्हाल.
एका एंटरटेनमेन्ट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत स्वरानं शाहरुखच्या या व्हॅनिटी व्हॅनमधील लक्झरी सुविधांचा खुलासा केला आहे. स्वरा म्हणली, शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन खूपच मोठी आणि अलिशान आहे. शाहरुखला न्यूज पाहणं आणि जगभरात काय चाललंय याचे प्रत्येक अपडेट ठेवणं त्याला आवडतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये चिल करणारा शाहरुख एक मजेदार व्यक्ती आहे.
अनुराग कश्यपचं ट्विटरला गुड बाय, नेमकं काय आहे या मागचं कारण?
स्वरा पुढे म्हणाली, 'शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनची बाथरुम तीन खोल्यांएवढी मोठी आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये हा एरिया त्यामानानं खूप मोठा आहे.'
स्वराच्या सिनेमांबाबत बोलायचं तर ती लवकरच ‘शीर कोरमा’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमात LGBTQ कम्यूनिटीचं स्ट्रगल दाखवण्यात आलं आहे. यामध्ये स्वरा भास्करसोबत दिव्या दत्ता आणि शबाना आजमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर शाहरुख खानला नुकतचं मेलबर्न येथे आयोजित इंडियन फिल्म फेस्टिवल अवार्ड शोमध्ये सन्मानित करण्यात आलं त्याला यावेळी एक्सीलेंस इन सिनेमा अवार्ड देण्यात आला.
VIDEO: तरुणीने गर्दीत खेचला सलमानचा हात, चाहते म्हणाले थोबाडीत मार!
Saaho Trailer : सुपरस्टार प्रभासचा हॉलिवूडपेक्षाही जबरदस्त अॅक्शन अवतार!
==============================================================================
VIDEO: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात, औषधापासून खाद्यपदार्थापर्यंत सगळ्याची सोय