Home /News /entertainment /

VIDEO: शाहरुख खानच्या करिअरमध्ये 'या' महिलांचा आहे मोठा वाटा; अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

VIDEO: शाहरुख खानच्या करिअरमध्ये 'या' महिलांचा आहे मोठा वाटा; अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुलगा आर्यन खान तुरुंगातून जामिनावर परत आल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी शाहरुखने आपल्या आगामी चित्रपटाचं काम पुन्हा सुरू केलं आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26  डिसेंबर-    बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता शाहरुख खान   (Shahrukh Khan)  बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुलगा आर्यन खान तुरुंगातून जामिनावर परत आल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी शाहरुखने आपल्या आगामी चित्रपटाचं काम पुन्हा सुरू केलं आहे. सध्या शाहरुख खान त्याचा खास मित्र आणि अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan)   'टायगर 3'   (Tiger 3) चं शूटिंग करत आहे.दरम्यान शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्यानं मान्य केलं आहे. की, त्याच्या करिअरमध्ये अनेक महिलांचा मोठा वाटा आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. शाहरुख खान नेहमीच आपल्या आयुष्यातील माहिती नसलेल्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतो. त्याच्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना फारच आवडतं. नुकताच सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख खान आपल्या करिअरमध्ये ,कोणकोणत्या महिलांचं कसं योगदान मिळालं याबद्दल सांगत आहे.यामध्ये शाहरुख म्हणत आहे, माझं करिअर घडवण्यात महिलांचा फार मोठा वाटा आहे. ज्यांनी मला वेळोवेळी बळ दिलं आणि समजावून सांगितलं'.
  या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख सांगत आहे की, माझ्या आयुष्यात अनेक महिला आहेत. ज्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. माझ्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत त्यांनी मला वेळोवेळी समजावून घेतलं. त्यांनतर दिग्दर्शिका आहेत जसं की फराह खान तिनं मला प्रत्येक बाबतीत साहाय्य केलं आहे. तसेच मीडियामध्ये काम करणाऱ्या अनेक महिला आहेत ज्यांचं मला सहकार्य लाभलं आहे. मी असं म्हणत नाहीय कि मला पुरुषांकडून मदत नाही मिळाली किंवा त्यांचं सहकार्य नाही लाभलं. परंतु माझ्या आयुष्यात नेहमीच महिला अग्रस्थानी राहिल्या आहेत. मग ती माझी आई असो, बहीण असो पत्नी किंवा मुलगी असो. आणि मला त्यांचा खूप आदर आहे. मी ही गोष्ट मनापासून सांगत आहे. कारण ती माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. असं म्हणत शाहरुख आपल्या भावना व्यक्त करत आहे. (हे वाचा:बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ओढवलं संकट ) हा व्हिडीओ समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते शाहरुखच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स देऊन आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. अनेकांनी शाहरुखच्या या विचारांचं कौतुक केलं आहे. शाहरुख नेहमीच आपल्या पत्नी आणि मुलीवर अतिशय प्रेम करत असल्याचं दिसून येतं. अभिनेत्याने पत्नी आणि मुलीला स्वतः ला हवं तसं राहण्याचं, आपल्या आवडीच्या क्षेत्रात वावरण्याचं आणि आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळेच गौरी खान आज एक उत्कृष्ट इंटेरियर डिझायनर म्हणून नाव मिळवत आहे. तर मुलगी सुहाना खानने नुकताच न्यूयॉर्कमधून आपल्या अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Shahrukh khan

  पुढील बातम्या