शाहरुख खान 2 वर्षांनंतर दिसणार सिल्व्हर स्क्रीनवर, या सिनेमातून करणार कमबॅक

शाहरुख खान 2 वर्षांनंतर दिसणार सिल्व्हर स्क्रीनवर, या सिनेमातून करणार कमबॅक

शाहरुख खान मागच्या दोन वर्षात निर्माता म्हणून खूप सक्रिय आहे. मात्र दोन वर्षात त्यानं अद्याप कोणत्याही सिनेमात काम केललं नाही.

  • Share this:

मुंबई, 7 जून : लॉकडाऊननंतर आता सिनेमांच्या शूटिंगसाठी काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करत सिनेमांचं शूटिंग करण्याला परवानगी देण्यात आल्यानंतर काही निर्माता आणि दिग्दर्शकांनी त्यांच्या नव्या प्रोजेक्टची प्लानिंग सुरू केल्याचं बोललं जात आहे. अशात शाहरुख खानच्या कमबॅकबद्दलही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय त्याच्या नव्या प्रोजेक्ट बद्दलही काही माहिती समोर आली आहे मात्र न्यूज 18 लोकमत या माहितीची पुष्टी करत नाही.

शाहरुख खान मागच्या दोन वर्षात निर्माता म्हणून खूप सक्रिय आहे. मात्र दोन वर्षात त्यानं अद्याप कोणत्याही सिनेमात काम केललं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला नेहमीच सिनेमात कधी दिसणार हा प्रश्न विचारला जातो. त्याच्याशी संबंधीत अनेक हॅशटॅग सुद्धा आतापर्यंत अनेकदा ट्रेन्ड झाले आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान राजकुमार हिरानींच्या सिनेमात दिसणार असल्याचं बोललं जात होतं. याबाबत शाहरुख लवकरच घोषणा करेल असा अंदाज आहे. पण अशात त्याच्या आणखी एका सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

FIR नंतर हिंदुस्तानी भाऊची एकता कपूरला लीगल नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

एका मीडिया रिपोर्ट नुसार शाहरुख खान आर माधवनच्या रॉकेटरी या सिनेमात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात तो कॅमियो रोल करणार आहे. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार शाहरुखनं या सिनेमातील काही सीन सुद्धा शूट केले आहेत. या सिनेमात शाहरुख एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. आर माधवनचा हा सिनेमा इस्रोचे प्रसिद्ध रॉकेट सायंटिस्ट नाम्बी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे.

अमिताभ-आयुष्मान यांच्या चित्रपटावर संकट; लेखिकेवर संहिता चोरल्याचा आरोप

याशिवाय शाहरुख खान आणखी एका सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात. आहे. मागच्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमात शाहरुख कॅमियो रोलमध्ये दिसणार आहे. मात्र याबाबत शाहरुखनं स्वतः कोणतीही घोषणा केलेली नाही.

लग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट? काय होत आहे ट्रेंड

First Published: Jun 7, 2020 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading