तब्बल 27 वर्षांनी शाहरुख खानचं होणार पदार्पण, या सिनेमात साकारणार खलनायक

अक्षय कुमारने '२.०' सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तर श्रद्धा कपूरही प्रभासच्या आगामी 'साहो' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 02:45 PM IST

तब्बल 27 वर्षांनी शाहरुख खानचं होणार पदार्पण, या सिनेमात साकारणार खलनायक

मुंबई, २४ एप्रिल- दाक्षिणात्य सिनेसृष्टीला आता बॉलिवूड आणि हॉलिवूडप्रमाणेच ओळख मिळत आहे. गेल्या काही वर्षांत 'बाहुबली', 'बाहुबली २', 'केजीएफ' सारख्या सिनेमांमुळे बॉलिवूडचे अनेक स्टार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत. नुकतंच अक्षय कुमारने '२.०' सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तर श्रद्धा कपूरही प्रभासच्या आगामी 'साहो' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सगळ्यात आता शाहरुख खान तमिळ सिनेमात पदार्पण करणार आहे. असं म्हटलं जातं की, शाहरुख दाक्षिणात्य सुपरस्टार विजय यांच्या आगामी Thalapathy 63 सिनेमात दिसणार आहे.

तुमच्या घरातली भांडणं तर माझ्यामुळेच कमी होत असतील, मोदींचा अक्षयला चिमटा

याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे या सिनेमात शाहरुख नायक नसून खलनायकाची भूमिका साकारणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमार Thalapathy 63 सिनेमात विजय आणि शाहरुख यांच्याच फाइट सीन दाखवणार आहेत. या सिनेमात शाहरुखची भूमिका १५ ते २० मिनिटांचीच असणार आहे. सुमारे चार ते पाच दिवस या सीनचं शूट होणार आहे. चेन्नई किंवा मुंबईमध्ये या सीनचं शूट केलं जाणार आहे.

अक्षय कुमारने विचारला असा काही प्रश्न की, हसायला लागले नरेंद्र मोदी

रिपोर्ट्सनुसार, Thalapathy 63 च्या निर्माते खलनायकासाठी एका नावाजलेल्या बॉलिवूड स्टारच्या शोधात होते. त्यांनी शाहरुखलाही याबद्दल विचारले आणि शाहरुखने या भूमिकेसाठी होकार दिला. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असं म्हटलं जातं की, या सिनेमात शाहरुख कुख्यात गुंडाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Loading...

अधुरी एक कहाणी- ...म्हणून प्रेम असूनही आज एकत्र नाहीत सनी देओल आणि डिंपल कपाडिया

२७ वर्षांत पहिल्यांदा-

विशेष म्हणजे 'थालापती' एक स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा असणार आहे. याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. जॅकी श्रॉफही दिसतील. शाहरुख पहिल्यांदा खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. याआधी रजनीकांतच्या '२.०' सिनेमात अक्षयने खलनायकी व्यक्तिरेखा साकारली होती.

बॉलिवूडमध्ये शाहरुखला २७ वर्ष पूर्ण झाली. एवढ्या वर्षात पहिल्यांदा किंग खान दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करणार आहे. एक तर दाक्षिणात्य सिनेमा आणि त्यात खलनायकी भूमिका... हा दुग्धशर्करा योग पाहण्यासाठी त्याचे कट्टर चाहते नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.

VIDEO: ...तेव्हा आंबा विकत घेण्याचीही ऐपत नव्हती - पंतप्रधान मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2019 02:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...