एकेकाळी मागे दगड घेऊन धावला होता दिग्दर्शक; आज शाहरूख झाला बॉलीवूडचा किंग

एकेकाळी मागे दगड घेऊन धावला होता दिग्दर्शक; आज शाहरूख झाला बॉलीवूडचा किंग

करिअरच्या सुरुवातीला शाहरूख खानला (shahrukh khan) खूप मेहनत घ्यावी लागली.

  • Share this:

मुंबई, 09 जून : अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) आज बॉलीवूडचा किंग आहे. मात्र तो बॉलीवूडचा किंग असाच झाला नाही. करिअरच्या सुरुवातीला त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. एकेकाळी दिग्दर्शक शाहरूखच्या मागे दगड घेऊनही धावला होता. त्यानंतर शाहरूखने स्वत:मध्ये बदल केला आणि आज तो या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला.

सुरुवातीला शाहरूख खान शूटिंगवर उशिरा जायचा. त्यावेळी एका डायरेक्टरला राग आला आणि शाहरूखला धडा शिकवण्यासाठी त्यांनी आपल्या हातात दगडच घेतला आणि ते दिग्दर्शक म्हणजे कर्नल राज कपूर (Colonel Raj Kapoor)

आपल्याला सर्वांना माहितीच आहे, शाहरूख खान सुरुवातीला टीव्हीमध्ये काम करायचा. टीव्ही सीरियल फौजीमधून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याचवेळी त्याला आयुष्यातील एक धडाही तो शिकला होता, ते म्हणजे वेळेचं महत्त्व.

हे वाचा - आलिशान घरंच वाटावं इतकी सुंदर आहे सलमान खानची VANITY; फोटो पाहूनच प्रेमात पडाल

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार 'फौजी'चे दिवंगत दिग्दर्शक कर्नर राज कपूर यांनी स्वत: शाहरूखला हा धडा दिला. त्यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं होतं.

कर्नल राज कपूर यांनी सांगितलं होतं, "शाहरूख नेहमी शूटवर उशिरा यायचा. शाहरूखची ही सवय मोडण्यासाठी एकदा मी त्याच्या मागे दगड घेऊन धावलो" दरम्यान याचवेळी "कॅमेरा शाहरूखवर प्रेम करायचा", असं म्हणत त्यांंनी शाहरूखचं कौतुकही केलं होतं.

हे वाचा - 'यापेक्षा CUTE काहीच नाही', कतरिनाच्या VIDEO वर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

"शाहरूख जेव्हा आपल्याला पहिल्यांदाच भेटला तेव्हादेखील त्याने कमांडोची भूमिका तो खूप चांगल्याप्रकारे निभावेल असा विश्वास दिला आणि तो विश्वास त्याने खरा करून दाखवला.  सुरुवातीला फौजीमध्ये शाहरूख जी भूमिका करत होता ती प्रमुख भूमिका नव्हती. मात्र त्यानंतर त्याने लोकांचं मन जिंकलं आणि तो या कार्यक्रमाचा श्वास झाला", असं कर्नल राज कपूर म्हणाले होते.

Published by: Priya Lad
First published: July 9, 2020, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading