शाहरुख छोट्या पडद्यावर घेऊन येतोय 'टेड टाॅक्स' शो

शाहरुख छोट्या पडद्यावर घेऊन येतोय 'टेड टाॅक्स' शो

'टेड टॉक्स' असं या शोचं नाव असून याचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.

  • Share this:

09 डिसेंबर : किंग खान अर्थात शाहरुख लवकरच एक टीव्ही शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टेड टॉक्स' असं या शोचं नाव असून याचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.

जेव्हा मुलं गेम खेळण्यात किंवा सोशल मीडियावर व्यस्त असतात तेव्हा मुलांना पालकांचा ओरडा बसतो. हाच ओरडा कसा टाळायचा याचा सल्ला शाहरुख या प्रोमोमधून मुलांना देताना दिसतोय.

शाहरुखच्या या नव्या शोमध्ये अनेक देशांतील नामवंत आणि दिग्गज व्यक्ती प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसंच या शोमध्ये येऊन ही मंडळी त्यांचे अनुभव आणि मतं मांडताना दिसतील. 'टेड टॉक्स' शो बाहेरच्या देशांत फारच प्रसिद्ध आहे.

याचच भारतीय व्हर्जन शाहरुख नव्या रुपात चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे. किंग खानचा हा आगळावेगळा शो येत्या 10 डिसेंबरला सर्वत्र प्रसारीत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 06:36 PM IST

ताज्या बातम्या