किंग खान म्हणतो, 'माझी पत्नी हिंदू, मी मुस्लिम तर मुलं...'

किंग खान म्हणतो, 'माझी पत्नी हिंदू, मी मुस्लिम तर मुलं...'

शाहरुख खानने शाळेत मुलांच्या फॉर्मवर भराव्या लागणाऱ्या धर्माबद्दल एका कार्यक्रमात त्याचं मत व्यक्त केलं. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने डान्स प्लस 5 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने एका गंभीर मुद्यावर मत मांडलं. शाहरुख खान मुलांच्या धर्माबद्दल बोलत असलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख खानने म्हटलं की, माझी पत्नी हिंदू आणि मी मुस्लिम आहे. तर माझी मुलं भारतीय आहेत.

शाहरुख खान म्हटला की, अनेकदा शाळेत एक फॉर्म भरावा लागतो. त्यात धर्म लिहावा लागतो. जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा तिने विचारलं की बाबा आपण कोणत्या धर्मातले आहात. तेव्हा मी त्यावर भारतीय असं लिहिलं. तेव्हा कोणत्याच धर्माचा विषय येत नाही.

सण समारंभानिमित्त शाहरुख खान फोटो शेअर करत असतो. तो ईद आणि दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करतो. गेल्या वर्षी गणेश पूजेवेळी अबरामसोबतचा फोटो लोकांना आवडला होता.

मराठी अभिनेत्रीच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खळबळ!

सध्या शाहरुख खानने ब्रेक घेतला आहे. 2018 मध्ये शाहरुखचा झिरो हा चित्रपट आला होता. त्यानंतर कोणत्याच चित्रपटात नसलेला शाहरुख सोशल मीडियावर चर्चेत असतो. आता तो कोणत्या चित्रपटाची घोषणा करतो याचीच वाट चाहते बघत आहेत.

सेजल शर्मा आत्महत्या प्रकरण: संशयाची सुई बॉयफ्रेंडवर, कुटुंबीयांची चौकशीची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2020 08:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading