S M L

अॅवाॅर्ड शोला शाहरुख खाननं केली हिराॅइन्सना 'अशी' मदत

लक्स गोल्डन अॅवाॅर्ड सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या शोचा होस्ट होता शाहरुख खान. त्यानं तमाम सुंदर हिराॅइन्सची मदत केली.

Updated On: Nov 22, 2018 06:10 PM IST

अॅवाॅर्ड शोला शाहरुख खाननं केली हिराॅइन्सना 'अशी' मदत

मुंबई, 22 नोव्हेंबर : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान आपल्या येऊ घातलेल्या झीरो सिनेमासाठी चर्चेत आहे. सिनेमाचं प्रमोशनही जोरात सुरू आहे. पण आता तो वेगळ्या कारणानं चर्चेत आहे.


लक्स गोल्डन अॅवाॅर्ड सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या शोचा होस्ट होता शाहरुख खान. त्यानं तमाम सुंदर हिराॅइन्सची मदत केली.यावेळी शाहरुख खाननं हिराॅइन्सचे गाऊन्स पकडून त्यांना मदत केली. नव्या हिराॅइन्ससाठी नेहमीच शाहरुख खान हा आवडता व्यक्ती आहे. कुठलीही मदत करायला तो मागेपुढे पाहत नाही. किंग खानची ही अॅक्शन एकदम सहज अशी होती.


Loading...

शाहरूख खानचा झिरो चित्रपट 21 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या टिझरवरून त्याची चर्चा होती. मुख्य भूमिकेत शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्यासोबत बऱ्याच दिवसांनंतर अभय देओलसुद्धा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.


त्याचबरोबर सिनेमात भाईजान सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोन, जुही चावला, करीश्मा कपूर,  आर माधवन आणि आलिया भट्ट हे पाहुणे कलाकार असणार आहेत. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार श्रीदेवी सुद्धा आपल्या दिसणार आहे. आनंद रायने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. एवढी मोठे कलाकार असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गात उत्सुकता वाढत चालली आहे.


झिरो सिनेमासोबत अनुपम खेरचा 'दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' आणि हॉलिवूडचा 'अॅक्वामेन' हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. पण आता यांच्या तारखेत बदल करण्यात आल्यानं झिरोची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई होणार आहे.


अनुपम खेरचा दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा 14  डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आणि हॉलिवूडचा चित्रपट अॅक्वामेन 7 डिसेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. नाताळच्या दिवसांमध्ये येणारा झिरो चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.#TRPमीटर : शनाया पुन्हा एकदा जिंकली, विक्रांत आला एक पाऊल मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 06:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close