True Gentleman पत्नी गौरीचा गाउन सांभाळताना दिसला शाहरुख खान VIDEO VIRAL

True Gentleman पत्नी गौरीचा गाउन सांभाळताना दिसला शाहरुख खान VIDEO VIRAL

शाहरुख खान पडद्यावर जशी चॉकलेट हीरो आणि जंटलमनची भूमिका करतो, तसा तो खऱ्या आयुष्यातही आहे, असं म्हणतात. पत्नी गौरी खान आणि शाहरुख खान यांचा एक ताजा व्हिडिओ याचीच साक्ष देतो.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक ताजा VIDEO बराच VIRAL झाला आहे. शाहरुख खानचे फॅन्स हा व्हिडिओ पाहून तो कसा खरा जंटलमन आहे, याचे गोडवे गात आहेत.

शाहरुख खान shah rukh khan पडद्यावर जशी चॉकलेट हीरो आणि जंटलमनची भूमिका करतो, तसा तो खऱ्या आयुष्यातही आहे, असं म्हणतात. शाहरुख आपल्या पत्नीची, कुटुंबाची कशी काळजी घेतो, याविषयी नेहमी बोललं, लिहिलं जातं. पत्नी गौरी खान gauri khan आणि शाहरुख खान यांचा एक ताजा व्हिडिओ याचीच साक्ष देतो.

सोमवारी शाहरुख खान आणि गौरी कुठल्या कार्यक्रमासाठी गेलेले असतानाचा हा व्हिडिओ आहे. प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानी यांच्या instagram अकाउंटवरून तो शेअर करण्यात आला आहे.

गौरी खान आणि शाहरुख इव्हेंटसाठी गेलेले असतानाचा हा व्हिडिओ आहे. गौरीने ब्लॅक गाउन घातला होता आणि त्याच्या होलोग्राफिक लाँग स्लीव्ह्ज होत्या. त्या गाउन आणि स्लीव्हजचा मोठा घेरा मागे लोंबत होता.

 

View this post on Instagram

 

The no 1 video from last night #shahrukhkhan #gaurikhan 👑👸

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

गौरी शाहरुखच्या थोडी पुढे चालत गेली आणि इतरांना त्रास होऊ नये, म्हणून शाहरुखने चटकन गाउन सांभाळून घेतला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हाच व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे.

---------------------

अन्य बातम्या

…आणि कार्यक्रमात ढसाढसा रडायला लागली दीपिका पदुकोण, VIDEO VIRAL

अंगावर शहारे आणणारा 'छपाक', मन हेलावणारा दीपिका पदुकोणचा अभिनय

घरी आल्यानंतर व्हायरल झाला लता दीदींचा 'हा' PHOTO, पाहून वाढेल चिंता

First published: December 10, 2019, 3:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading