रिअल हिरो! ऐश्वर्याच्या मॅनेजरचा जीव वाचवणाऱ्या शाहरुखचं सलमाननं असं केलं कौतुक

शाहरुखनं दाखवलेल्या या धाडसाचं आणि प्रसंगावधानाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 09:11 AM IST

रिअल हिरो! ऐश्वर्याच्या मॅनेजरचा जीव वाचवणाऱ्या शाहरुखचं सलमाननं असं केलं कौतुक

मुंबई, 31 ऑक्टोबर : बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनीही यंदा सर्वांनी दिवाळी पार्टी दिली. मात्र या पार्टीमध्ये घडलेल्या एका दुर्घटनेत अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायची मॅनेजर शाहरुख खाननं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावली. बच्चन कुटुंबीयांनी दिलेल्या पार्टमध्ये ऐश्वर्याची मॅनेजर अर्चना सदानंद हिच्याही लेहंग्याला आग लागली मात्र अभिनेता शाहरुख खाननं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अर्चनाचा जीव वाचवला. दरम्यान यात शाहरुखही काही प्रमाणात जखमी झाला. ही गोष्ट अभिनेता सलमान खानला समजली आणि तो शाहरुखचा चाहता झाला आहे. त्यानं शाहरुखसाठी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सगळीकडे व्हायरल होत आहे.

सलमाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर शाहरुखचाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शाहरुखचा सुपरहिट सिनेमा ‘हॅप्पी न्यू इअर’मधील ‘मनवा लागे’ या गाण्याचा आहे. या गाण्यातील एका सीनमध्ये शाहरुखच्या शर्टला आग लागते तरीही तो हसत हसत पुढे जातो असं दाखवण्यात आलं आहे. सलमाननं शेअर केलेल्या या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला सलमानचा आवाज ऐकू येत आहे. सलमान म्हणतो, हिरो तो असतो, जो आगीत उडी मारुन ती विझवतो आणि समोरच्या व्यक्तीला वाचवतो. हा व्हिडीओ सलमाननं इन्स्टाग्रामवर शाहरुखला टॅग सुद्धा केला आहे.

घटस्फोटानंतरही आनंदात जीवन जगत आहेत बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री

Loading...

 

View this post on Instagram

 

@iamsrk

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

दरम्यान काल कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खाननं या घटनेला दुजोरा दिला. फरहाननं एका वृत्तपत्राचं कात्रण शेअर करत शाहरुख खानचे आभार मानले आहेत. फराहनं लिहिलं, शाहरुख खान, मोहब्बत मॅन ते सुरक्षा रक्षक. अर्चना लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करते. फराहनं जे कात्रण शेअर केलं आहे त्यानुसार अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी अचानक अर्चना संदानंद हिच्या लेहंग्या आग लागली आणि ती वाढत गेली. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या शाहरुख धाडस दाखवत अर्चनाला वाचवण्यासाठी पुढे आला आणि ती आग विझवली मात्र यात त्यालाही दुखापत झाली. तर अर्चनाचं 15 % शरीर या आगीत भाजलं आहे.

गोव्याच्या 'क्लब्स'मध्ये विकलं जातंय 'या' बोल्ड अभिनेत्रीच्या नावाने ड्रिंक्स

अर्चना आपल्या मुलीसोबत या पार्टीमध्ये आली होती. ती कोर्टयार्डमध्ये होती त्यावेळी अचानक तिच्या लेहंग्याला आग लागली. ती मदतीसाठी ओरडत होती मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांना काय करावं हे समजत नव्हतं. त्यावेळी शाहरुखनं धावत जाऊन आपल्या कोटच्या मदतीनं ही आग विझवली. मात्र यात काही प्रमाणात शाहरुखलाही दुखापत झाली. अर्चनाला नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. शाहरुखनं दाखवलेल्या या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

'दीपिकानं मला घरातून बाहेर काढण्याचा प्लान केला होता', आईचा धक्कादायक खुलासा!

=================================================================

VIDEO : ठाण्यात रंगली रेड्याची झुंज, स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 09:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...