शाहरुख खान म्हणतोय, 'मी आता ज्येष्ठ नागरिक झालो'

शाहरुख खान म्हणतोय, 'मी आता ज्येष्ठ नागरिक झालो'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता शाहरुख खान एकत्र होते. तेव्हा 'मला आतापर्यंत महाराष्ट्रानं खूप दिलं, आता परतफेड करायची वेळ आली आहे.'

  • Share this:

24 जानेवारी : दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उद्योग, क्रिडा आणि अभिनय क्षेत्रातील प्रत्येक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता शाहरुख खान एकत्र होते. तेव्हा 'मला आतापर्यंत महाराष्ट्रानं खूप दिलं, आता परतफेड करायची वेळ आली आहे.' असं शाहरुख म्हणाला. मानवतावादी कार्य, महिला आणि लहान मुलांना समाजात समान आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केला, म्हणून शाहरुखचा दावोसमध्ये गौरव करण्यात आला. यावेळी हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लँशेट आणि एल्टन जॉन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.

'मी जेव्हाही मुख्यमंत्र्यांना भेटतो, तेव्हा मी त्यांना विचारतो, मी राज्यासाठी काय करू ते सांगा. कारण मी आता ज्येष्ठ नागरिक झालो आहे. मला महाराष्ट्रानं भरभरून प्रेम दिलं, असंही शाहरुख त्याच्या नेहमीच्या खोडकर शैलीत म्हणाला.

शाहरुखच्या अभिनयाबरोबरच त्याच्या चंचल आणि विनोदी स्वभावाचेही चाहते आहेत. आणि त्यात त्याला देशाविषयीचं प्रेम पाहून त्याचे चाहते खूश होणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2018 09:29 AM IST

ताज्या बातम्या