Video : दीपवीरच्या रिसेप्शनला शाहरुखनं केला जोरदार डान्स!

Video : दीपवीरच्या रिसेप्शनला शाहरुखनं केला जोरदार डान्स!

दीपवीरच्या रिसेप्शनच्या वेळी बाॅलिवूडची सगळी लोकप्रिय गाणी लावली होती. त्यावर हे स्टार्स आनंदानं थिरकत होते. त्यात आता शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

  • Share this:

मुंबई, 2 डिसेंबर : रणवीर सिंग-दीपिकाचं काल ( 1 डिसेंबर ) मुंबईत ग्रँड रिसेप्शन झालं. अख्खं बाॅलिवूड या रिसेप्शन पार्टीला अवतरलं होतं. हे सर्व कलाकार पडद्यावर विविध भूमिका साकारतात, पण प्रत्यक्षात एकमेकांचे चांगले मित्र असतात. तेच चित्र या पार्टीत दिसलं.

यावेळी बाॅलिवूडची सगळी लोकप्रिय गाणी लावली होती. त्यावर हे स्टार्स आनंदानं थिरकत होते. त्यात आता शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

शाहरुख खान चल छैया छैया गाण्यावर थिरकला आणि त्याला साथ द्यायला आला नवरदेव. होय, रणवीर सिंगला नाचायचा मोह आवरला नाही. त्यानं किंग खानला साथ दिली. शाहरुखबरोबर डान्स करायला मग मलायकाही सरसावली. हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत मुकेश अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी, ईशा अंबानी, राधिका मर्चंट हजर होतेच, शिवाय क्रिकेट-बाॅलिवूडच्या हस्ती उपस्थित होत्या.

क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी ,क्रिकेटर कपिल देव ,सुजीत सरकार ,जावेद अख़्तर , हृतिक रोशन ,रेखा ,बोनी कपूर,सोहा अली खान ,कुणाल खेमु ,रोहित शेट्टी ,संजय दत्त ,मान्यता दत्त ,सैफ़ अली खान ,सारा अली खान ,करीना कपूर खान ,किरण राव ,इम्तिहाज अली ,जोया अख़्तर ,जूही चावला ,रानी मुखर्जी ,वाणी कपूर ,शिल्पा शेट्टी ,जानवी कपूर ,अरशद वारसी ,कल्कि कोचलीन ,रोहित शेट्टी ,अब्बास मस्तान ,अनिल कपूर ,फ़रहाँ खान ,कृति सेनन,सोनी राजदान, डायना पेंटी, वरुण धवन ,मलाईका अरोरा,रवीना टंडन यांच्याबरोबर अमिताभ बच्चन ,ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन ,श्वेता बच्चन नंदा ही मंडळीही वधूवरांना शुभेच्छा द्यायला पोचले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading